Beed News : गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीने घेतला गळफास  file photo
बीड

Beed News : गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीने घेतला गळफास

पंधरा दिवसांपूर्वी बीड शहरातील हॉटेल यशोदा परिसरात पिस्टल घेऊन एक तरुण फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

पुढारी वृत्तसेवा

The accused, who possessed a country-made pistol, ended his life by hanging himself

बीड, पुढारी वृत्तसेवा : शहरात गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या आणि खो-खो चा राष्ट्रीय खेळाडू असलेल्या तुकाराम गंगाधर करांडे (वय 28 रा. खडकी देवळा, ता. वडवणी, सध्या रा. स्वराज्यनगर, बीड) याने बुधवार (दि.19) पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून विविध चर्चाना उधाण आले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी बीड शहरातील हॉटेल यशोदा परिसरात पिस्टल घेऊन एक तरुण फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पथकाने कारवाई करत करांडे याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर त्याची दोन दिवसांत जामिनावर सुटका झाली होती. दरम्यान, जामिनानंतर त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वयेही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे तो काही काळापासून फरार असल्याचे सांगितले जात होते. याच पार्श्वभूमीवर त्याने पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या के ली आहे.तुकाराम खो-खोचा राष्ट्रीय खेळाडू तुकाराम करांडे हा बीड तालुक्यातील खडकी येथील रहिवासी होता.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने शिक्षण पूर्ण केले होते. तो खो खो चा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून प्रशिक्षक म्हणून देखील काम करत होता-

तुकाराम खो-खोचा राष्ट्रीय खेळाडू

तुकाराम करांडे हा बीड तालुक्यातील खडकी येथील रहिवासी होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने शिक्षण पूर्ण केले होते. तो खो खो चा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून प्रशिक्षक म्हणून देखील काम करत होता-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT