Beed News : आरोपींनी सौरभ सोनवणेला ५७ कॉल केले file photo
बीड

Beed News : आरोपींनी सौरभ सोनवणेला ५७ कॉल केले

विलास घुले हत्या प्रकरणात रमेश घुले यांचा गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

The accused made 57 calls to Saurabh Sonawane

बीड, पुढारी वृत्तसेवा विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात त्यांचे बंधू रमेश घुले यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तपासाबाबत काही गंभीर मुद्दे उपस्थित करत आरोपींनी खासदारपुत्र सौरभ सोनवणे यांना तब्बल ५७ वेळा फोन केल्याचा दावा केला. हे कॉल तपासी अधिकाऱ्यांनी आपल्याला दाखविल्याचेही त्यांनी सांगितले.

स्व. विलास घुले यांचे बंधु रमेश घुले यांनी रविवारी पोलिस अधिक्षक कार्यालयात सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी रमेश घुले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपींकडून सौरभ सोनवणे यांना करण्यात आलेले कॉल दवाखान्यातूनही झाल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण कॉल रेकॉर्डचा तपास सीआयडीने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, विलास घुले यांचा मृत्यू भूल दिल्यानंतर झाल्याचा दावा करत रमेश घुले यांनी संबंधित डॉक्टरांबाबतही संशय व्यक्त केला. ऑपरेशननंतर पुन्हा भूल देण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल उपस्थित करत डॉक्टरांना कोणाकोणाचे फोन आले होते, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सीआयडीकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू असून, कॉल रेकॉर्ड, रुग्णालयातील घडामोडी आणि संबंधित व्यक्तींच्या संपर्काची चौकशी करण्याची मागणी रमेश घुले यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

आ. धस सीआयडी कार्यालयात कशासाठी आले होते ?

पुणे येथील सीआयडी कार्यालयात आपण भेटीसाठी गेलो असताना भाजप आमदार सुरेश धस तेथे आले होते, असा दावा रमेश घुले यांनी केला. ते सीआयडी तपासाबाबत माहिती घेण्यासाठी आले होते की दबाव टाकण्यासाठी, हे अद्याप आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. "आम्हाला समर्थन करू नका; मात्र विरोधही करू नका. माझ्या भावाचा खून झाला आहे," अशी विनंतीही त्यांनी आमदार सुरेश धस यांना केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT