Kaij News : उसने दिलेले पैसे परत मागताच सत्तूरने वार  pudhari photo
बीड

Kaij News : उसने दिलेले पैसे परत मागताच सत्तूरने वार

उसने दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणा वरून पाठलाग करून एकला सतूरने वार करून मारहाण केल्याची घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

Sattur stabs him for demanding the loan back

केज, पुढारी वृत्तसेवा : उसने दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणा वरून पाठलाग करून एकला सतूरने वार करून मारहाण केल्याची घटना घडली. दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुमारास देवगाव येथील सुनिल सुभाष मुंडे (वय २७ वर्ष) हे बरड फाटा येथून मोटार सायकल वरून घरी जात असताना दहिफळ वडमाऊली फाटा ते देवगाव रोडवर देवगावच्या शिवारात रामदास जगन्नाथ मुंडे, रामहारी सुंदर मुंडे, विष्णु ज्योत ीराम मुंडे व अनोळखी अनोळखी चार जणांनी पाठलाग करून अडविले.

रामदास जगन्नाथ मुंडे हा सुनील मुंडे याला म्हणाला की, गाडी थांबव तुला बोलायचे आहे असे म्हणून सुनिल मुंडे यांनी गाडी रोडच्या बाजूला ऊभी केली; त्यावेळी रामदास जगन्नाथ मुंडे हा त्याला म्हणाला की, तू मला सारखे कशाचे पैसे मागतोस, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. तेव्हा सुनिल त्याला म्हणाला की, माझे ऊसणे घेत-लेले पैसे मला परत दिले नाहीस म्हणून मी तुला पैसे मागितले. असे म्हणताच तुझे कशाचे पैसे द्यायचे ? मला माहित नाही. असे म्हणून रामदास जगन्नाथ मुंडे याने सुनील मुंडे याला शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून मुक्कामार दिला.

यावेळी हातातील सत्तूरने सुनील मुंडे याच्या डोक्यात वार केला; मात्र सुनीलने उजवा हात आडवा लावला त्यामुळे वार चुकून डोक्यात किरकोळ दुखापत झाली. तसेच हाताला अंगठ्याला मुक्कामार लागला. त्या नंतर त्यांनी सुनील मुंडे यास त्याने पुन्हा जर पैसे मागितलेस तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. सुनील मुंडे यांच्या तक्रारी वरून रामदास जगन्नाथ मुंडे, रामहारी सुंदर मुंडे, विष्णु ज्योतीराम मुंडे, तीन अन-ओळखींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT