Police Patil Recruitment : बीड जिल्ह्यातील पोलिस पाटील भरतीवर प्रश्नचिन्ह  file photo
बीड

Police Patil Recruitment : बीड जिल्ह्यातील पोलिस पाटील भरतीवर प्रश्नचिन्ह

दहावी पात्रता, प्रश्न मात्र एमपीएससी स्तराचे; चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Question mark on police patil recruitment in Beed district

आष्टी, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेवर उमेदवारांकडून दहावी उत्तीर्ण ही किमान शैक्षणिक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पात्रता ठेवून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात झालेल्या लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर स्पर्धा परीक्षा, पोलिस भरती तसेच एमपीएससीच्या धर्तीवरील पोलीस पाटील असल्याचा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे. त्यामुळे दहावी पात्र-तेवर परीक्षा देण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घेण्यात आलेल्या या लेखी परीक्षेसाठी ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्य २२ फेब्रुवारी २०२६ रोजी कुटुंबातील युवकांनी मोठ्या अपेक्षेने अर्ज भरले होते. रोजंदारीची कामे करून पैसे साठवत परीक्षा शुल्क भरून त्यांनी या भरतीत सहभाग घेतला.

मात्र प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न हे उच्च शिक्षणाच्या पातळीवरील असल्याने पेपर सोडवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा ८० गुणांची तर तोंडी परीक्षा २० गुणांची ठेवण्यात आली होती.

परीक्षा झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या निकालात दहावी, बारावी व पदवीधर अशा शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना अतिरिक्त गुण देत क्रमवारी लावण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे केवळ उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

दहावी पात्रतेची भरती जाहीर करून प्रत्यक्षात उच्च स्तराचे प्रश्न विचारणे आणि निकाल प्रक्रियेत उच्च शिक्षणाला प्राधान्य देणे यामुळे उमेदवारांची दिशाभूल झाली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून संबंधित प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, तसेच उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी परीक्षेला बसलेल्या विद्याथ्यर्थ्यांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT