Protest March in Gevrai
विशाळगड घटनेच्या निषेधार्थ मराठा- मुस्लिम समाज आज गेवराई शहरात उतरला.  Pudhari News Network
बीड

गेवराईमध्ये विशाळगड घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड जवळील गजापूर येथील अतिक्रमणाच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट करत तोडफोड आणि हिंसाचार करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध मराठा- मुस्लिम समाज पूर्ण ताकदीने आज (दि.१९) गेवराई शहरात उतरला. जोरदार घोषणाबाजी करत शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.

या हल्ल्यात नुकसान ग्रस्त लोकांना तत्काळ मदत करुन घटनेला जबाबदार असणाऱ्यांना अटक करुन न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन तहसिलदार संदिप खोमने यांना देण्यात आले.

यावेळी मुफ्ती मोईनुद्दीन कासमी, मौलाना शब्बीर सहाब, मुफ्ती युनुस सहाब, मुफ्ती गयाज, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी जि.प. सभापती युद्धाजित पंडित, युवा नेते शिवराज पवार, मराठा समन्वयक महेश दाभाडे, मनसे जिल्हा प्रमुख राजेंद्र मोटे, यशराज पंडित, नगरसेवक जानमोहंमद बागवान, मोमीन मौज्जम, मंजूर बागवान, याहिया खान, फेरोज सेठ, शेख खाजा, सय्यद एजाज, शेख बब्बू, शोहेब अत्तार महेश बेदरे, दलित नेते धम्मापाल कांडेकर, रिपाईचे किशोर कांडेकर, विनोद सौंदरमल, विलास सुतार, माऊली गंगाधर, काझी अमान, अॅड. निकम, रोहित पंडित, श्रीनिवास बेदरे,शाहरुख पठाण,वसीम फारोकी,सय्यद नजीब,उस्मान शेख,सभापती मुजीब पठाण ,उपसरपंच हिरापुर अमजद पठाण,शेख अमजद, हारुण तांबोळी, सय्यद शहेदाद, जुनेद बागवान, अनसार शेख, सरवर पठाण, शौकत पठाण, वाजीद तांबोली, आवेज शरीफ, शौकत सौदागर, शेख नविद, अलीम शेख, ऋृषिकेश बेदरे आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT