बीड : शेतात काम करताना अंगावर विजेची तार पडून महिलेचा मृत्यू

केज येथील मानेवाडी परिसरातील घटना
Woman dies of electric shock
विजेचा धक्का बसून महिलेचा मृत्यू झाला

केज : शेतातील पोलवरील विद्युत तारा वाऱ्याने तुटून खुरपणी करीत असलेल्या महिलेच्या अंगावर पडल्याने विजेचा झटका लागून महिलेचा जागीच मृत्यू झाला. विमल बाबुराव माने वय (४५ वर्ष) असे महिलेचे नाव आहे. ही घटना केज तालुक्यातील मानेवाडी परिसरात बुधवारी (दि.१७) दुपारी २:३० च्या सुमारास घडली.

Woman dies of electric shock
हृदयद्रावक : गोव्यात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

विमल माने या शेतात खुरपणी करीत होत्या. दुपारीच्या सुमारास वाऱ्याने पोलवरील विद्युत तारा एकमेकांना चिकटून स्पार्किंग झाल्याने एक विद्युत तार तुटून खाली आली. यावेळी खुरपणी करत असलेल्या विमल माने या उठून पुढे सरकत असताना लोंबकळत असलेली विज वाहक तारेला त्यांचा स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार झटका बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर चनशेट्टी, पोलीस उपनिरक्षक राहुल पतंगे, सहाय्यक पोलीस उपनिरक्षक रमेश सिरसाट यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. माने यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news