जलजीवनच्या कामासाठी मोर्चा file photo
बीड

Beed News : जलजीवनच्या कामासाठी मोर्चा

सोनीजवळ्यात पाणी पेटले; तहसीलदारांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Protest March for Jal Jeevan Works

केज, पुढारी वृत्तसेवा : जलजीवन योजनेचे नळाद्वारे घरोघरी पाणीपुरवठा करण्यात यावा. जलजीवन मिशनचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या गुत्तेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागण्यासाठी केज तालुक्यातील सोनीजवळा येथील महिलांनी ग्रामपंचायत सदस्य मिनाज पठाण यांच्या नेतृत्व-ाखाली सोमवारी सकाळी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

तीस वर्षांपूर्वीची केज धारूर शहरासह बारा गाव पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याने सोन-ीजवळा गावाला पाणीपुरवठा होत नाही. तर या गावाला जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत ४ कोटी १३ लाख रुपयांच्या नळ योजनेचे काम संबंधित गुत्त्-ोदाराने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले नाही. त्यामुळे संबंधित गुत्तेदारावर गुन्हा दाखल करावा.

त्यामुळे गावकऱ्यांवर पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली असून २ कि. मी. अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे. पाणी आणताना महिला व वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य मिनाज पठाण यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी सोमवारी सकाळी १०.३० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

यावेळी नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी त्यांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारत तत्काळ पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मोर्चात देविदास जोगदंड, सत्तर शेख, धनराज कांबळे, श्रीधर वैरागे, अमोल राऊत, जुनेद शेख, खलील शेख, सुरज उजगरे, गौतम जोगदंड, सज्जाद शेख, रफिक शेख, दुसेन पठाण, रोहित जोगदंड, विनोद महाजन यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT