Waluj Mahanagar : वळदगावात ग्रा.पं.ला शेतकऱ्याकडून सार्वजनिक विहिरीसाठी जमीन दान

शेतकरी तथा माजी उपसरपंच संजय झळके यांनी सिडको वाळूज महानगरालगत असलेली एक गुंठा जमीन ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीसाठी दान केली आहे.
Waluj Mahanagar
Waluj Mahanagar : वळदगावात ग्रा.पं.ला शेतकऱ्याकडून सार्वजनिक विहिरीसाठी जमीन दानFile Photo
Published on
Updated on

In Valadgaon village, a farmer donated land to the Gram Panchayat for a public well.

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरालगतच्या जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीतही आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून वळदगाव येथील शेतकरी तथा माजी उपसरपंच संजय झळके यांनी सिडको वाळूज महानगरालगत असलेली एक गुंठा जमीन ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीसाठी दान केली आहे.

Waluj Mahanagar
युती, आघाडीचे फॉर्म्युले ठरले, शिवसेना-भाजपमध्ये फिप्टी-फिप्टी

वळदगाव येथे पाण्याचा कोणताही मुख्य स्रोत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून विहीर खोदकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विहिरीसाठी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नसल्याने विहिरीचे काम थांबले होते. आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून वळदगाव येथील प्रतिष्ठित शेतकरी तथा माजी उपसरपंच संजय झळके यांनी सिडको वाळूज महानगरालगत गट क्र. १२ मधील त्यांच्या जमिनीतून १ गुंठा जमीन सार्वजनिक विहिरीसाठी ग्रामपंचायतीला दान केली.

यासाठी त्यांनी कोणताही मोबदला घेतला नाही. सोमवारी (दि.२२) झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत संजय झळके यांनी सरपंच अमर डांगर व ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद रिढे यांचेकडे दानपत्र सुपूर्द केले. यावेळी माजी पं.स. सदस्य तथा ग्रा.पं. सदस्य गणेश नवले, माजी उपसरपंच विष्णू झळके, अशोक खोतकर, विनोद खोतकर आदी उपस्थित होते.

Waluj Mahanagar
Waluj Mahanagar : अवैध धंद्यांविरोधात गावबंद आंदोलन

गावाला मोफत पाणीपुरवठा

वळदगाव येथे मोलमजुरी करणारे कामगार मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. नागरी वसाहती वाढल्याने गावाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. नागरिकांना चार बोअरवेलद्वारे तसेच पिण्यासाठी एमआयडीसीच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. गतवर्षी उन्हाळ्यात या बोरवेलच्या पाणी पातळीत कमालीची घट झाल्याने संजय झळके यांनी एक रुपयाही न घेता त्यांच्या विहिरीवरून संपूर्ण गावाला मोफत पाणीपुरवठा केला आहे. या सामाजिक कार्याबद्दल झळके यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news