Beed News : बीडमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने जीवन संपवले file photo
बीड

Beed News : बीडमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने जीवन संपवले

माजलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने बीड येथील राहत्या घरी गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

पुढारी वृत्तसेवा

Police Constable Ends Life in Beed

बीड, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने बीड येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. बाळकृष्ण जायभाय (४२) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मुळ पिंपळनेर (ता. शिरुर कासार) येथील रहिवाशी असलेले बाळकृष्ण जायभाय हे गेल्या काही वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत होते. स्थानिक गुन्हे शाखेतही त्यांनी सेवा बजावलेली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची बदली माजलगाव येथे झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून ते एका गुन्ह्यातील तपासाकरिता पुणे येथे गेले होते. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले. कुटूंबीयांसोबत जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते.

रात्री उशीरा बाळकृष्ण जायभाय यांनी जिन्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली. ही बाब सकाळी घडकीस आली. जायभाय यांनी घराच्या दाराला बाहेरुन कडी लावली होती, शेजारी राहत असलेल्या भाडेकरुने हा प्रकार पाहिल्यानंतर कुटूंबीयांना माहिती दिली.

यानंतर शिवाजीनगर पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर घटनास्थळी भेट देत पंचनामा करण्यात आला. जायभाय यांच्या पार्थिकवावर पिंपळनेर या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT