डीजे लावला तर थेट कारवाई, पोलिस आयुक्तांचा इशारा

शिवजयंती उत्सवास रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
sambhajinagar news
डीजे लावला तर थेट कारवाई, पोलिस आयुक्तांचा इशारा file photo
Published on
Updated on

Police Commissioner warns of immediate action if DJ is used

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

डीजेला बंदी आहे, मात्र दोन टॉप, दोन बेस लावण्यास मनाई नाही. मात्र कोणी डीजेचा चोरूनही दणदणाट केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे. शिवजयंतीला डीजे वाजवून कोणाचे आरोग्य धोक्यात आणले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी बजावले. एका जयंतीच्या कार्यक्रमात अनेकांच्या कानाला गंभीर इजा झाल्याने शहर डीजेमुक्त करण्याचा सर्वांनी संकल्प केला. गणेशोत्सव, नवरात्रीला डीजे न वाजल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत होऊ नये हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते. त्यामुळे त्यांचे विचार आपण सर्वांनी आचरणात आणावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

sambhajinagar news
पीडब्ल्यूडीचा क्यूआर घोटाळा २ हजार कोटींचा

शांतता समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, शिवजयंतीसाठी केवळ १९ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य वाजवण्याची परवानगी असेल. गेल्या वर्षी एका तरुणाशी बोलताना त्याला काहीच ऐकू येत नव्हते, त्याचे कान डीजेमुळे सुन्न झाले होते.

अशा आवाजाचा त्रास वृद्ध, रुग्ण आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना होतो. महाराजांच्या जयंतीत आपल्याच समाजाला त्रास होणार असेल तर त्या उत्सवाचा काय फायदा? महाराजांनी दिलेला स्त्री सन्मान आणि शिस्तीचा आदर्श आपल्या वर्तनातून दिसला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

sambhajinagar news
kidnapping Case : निवृत्त वन अधिकाऱ्याचे फिल्मी स्टाईल अपहरण ; डोळ्यावर पट्टी बांधून लुटले

क्रांती चौकात महिलांसाठी स वतंत्र व्यवस्था : किशोर शितोळे

शिवजन्मोत्सवात क्रांती चौक येथे महिलांना उभे राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, अशी मागणी उपस्थित महिलांनी केली. त्यावर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनीही व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच यंदाची शिवजयंती विधायक आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. शहरात प्रत्येक वॉर्डात किल्ले स्पर्धा, निबंध आणि पोवाड्यांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत शिवचरित्र पोहोचविण्याचा मानस आहे.

डीजे, लेझर टाळण्याचे आवाहन केले. शारीरिक नुकसान कधीही भरून न येणारे असल्याचे सांगितले. महाराजांनी शिस्त आणि समाजाचा सन्मान शिकवला, तोच आदर्श आपण जपला पाहिजे, असे ते म्हणाले.

बैठकीत नागरिकांच्या मागण्या

▶ मिरवणुकीत येणाऱ्या दारुड्यांवर कारवाई करा

▶ पुंडलिकनगर रस्त्यावरील हातगाड्या हटवा

▶ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जीव्हीपीआरने खोदलेले रस्ते दुरुस्त करा

▶ विजेच्या तारा हाताला येतात, महावितरणने केवल, तारा वर घ्याव्यात

▶ महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी मिरवणुकीत महिला पोलिसांची संख्या वाढवावी

मिरवणुकीत फिरणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करा

▶ क्रांती चौकात किमान २० सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

▶ तडीपार, सराईत गुन्हेगार चाकू घेऊन येतात, त्यांना आवरा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news