MLA Sandeep Kshirsagar : प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी  File Photo
बीड

MLA Sandeep Kshirsagar : प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी

आ.क्षीरसागरांचा निर्धार; बीड नगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी व्यूहरचना

पुढारी वृत्तसेवा

Only honest and loyal workers get a chance MLA Sandeep Kshirsagar

बीड, पुढारी वृत्तसेवा : आगामी बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (शरदचंद्र पवार गट) नगराध्यक्ष तसेच सर्वच प्रभागांतील नगरसेवक निवडून येतील, असा ठाम विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. प्रामाणिक, निष्ठावंत आणि जन-तेशी नाळ जोडून काम करणाऱ्यांनाच संधी दिली जाणार असून, कोणत्याही परिस्थितीत साखळी तुटू देणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

शनिवारी शहरातील झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या महासभेत आ. क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीस शहरातील सर्व वॉडांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार तसेच हजारोंच्या संख्येने समर्थक उपस्थित होते. यावेळी आ. क्षीरसागर म्हणाले, अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले असून नगरपालिकेची निवडणूक लवकर होण्याची शक्यता आहे.

विरोधक जातीचे राजकारण करून जनतेला गोंधळवण्याचा प्रयत्न करतील. पण आपण लोकाभिमुख काम करून उत्तर द्यायचे आहे. प्रत्येक वॉर्डात कार्यकत्यांनी जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आमदारकीच्या निवडणुकीत सोबत राहिलेले आणि घरच्यांसारखे काम करणारे कार्यकर्तेच यावेळी नगरसेवक म्हणून निवडून येतील.

नगराध्यक्ष पदाचा उमेदवार १० हजार मतांनी विजयी होईल, असा मला ठाम विश्वास आहे. कार्यकर्त्यांनीही एकदिलाने आ. संदीपभैय्या जो उमेदवार देतील, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राह असा निर्धार व्यक्त केला. या बैठकीला माजी आ. सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साखळी तुटता कामा नये आ. संदीप क्षीरसागर

शहरातील कोणत्याही प्रभागात साखळी तुटली नाही पाहिजे. साखळी टिकली तर बीड नगरपालिकेचा ताबा आपल्या हातात येईल. पण जर कोणी उमेदवार साखळी तोडून गेला, तर जनतेसमोर मी स्पष्ट सांगीन की तो माझा उमेदवार नाही. अशा साखळी तोडणाऱ्यांना जनता स्वतः घडा शिकवेल, असा इशारा आ. क्षीरसागरांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT