Mother and son brutally beaten up for filing a complaint
आष्टी पुढारी वृत्तसेवा :
आष्टी तालुक्यातील चोभ निमगाव येथील शेतीच्या बांधाच्या कारणावरून वाद झाला, या वादाची तक्रार पोलिसांत का दिली म्हणून आष्टी तालुक्यातील माय-लेकारास सहा जणांनी बेदम मारहाण करून तक्रारदाराच्या गाडीची तोडफोड देखील केली. या प्रकरणी पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहाही आर ोपी अद्यापही अटकेत नाहीत.
धामणगाव येथील सुमित बाळासाहेब ढोबळे वय २४ वर्षे यांची चोभ निमगाव येथे शेती असून त्यांच्या शेजारी महादेव अश्राजी नरवडे यांची शेती आहे, यांच्यात आणि ढोबळे यांच्यात बांधावरून वाद असून यातूनच दिनांक ३ जून रोजी वाद झाला. या वादाची तक्रार शारदा बाळासाहेब ढोबळे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
दरम्यान याच दिवशी सायंकाळी साडे पाच च्या सुमारास सुमित ढोबळे हे त्यांच्या कारने आई, भाऊ असे तिघे जन धामणगाव कडे जात असताना कासारी गावाच्या नदीच्या पुलावर एका सिल्व्हर रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी समोर येवून गाडी आडवी लावली यांनी यातील आरोपी योगेश रामेश्वर मुटकुळे, प्रवीण आबासाहेब श्रीखंडे, अमोल बबन दरेकर, सुरज पवार, अक्षय पवार आणि बंडू पवार यांनी गाडीतून उतरून बेदम मारहाण केली.
यात आई शारदा, भाऊ अमित यांही जबर मारहाण केली. यात सुमित त्याची आई शारदा आणि भाऊ अमित हे गंभीर जखमी झाले असून अहिल्या नगर येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या प्रकरणी सुमित ढोबळे यांच्या तक्रारी वरून या सहा आर ोपींच्या विरुद्ध आष्टी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी अद्यापही अटकेत नाहीत.
जिल्ह्यात गुंडागर्दी हि वाढत असून पोलिसांचा वाचक राहिला नसल्याने गावगुंड अशा पध्दतीने सर्रास खुलेआम हातात शास्त्र घेवून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत आहे.