

Ended life due to demand for money for optical
अंबाजोगाई : पुढारी वृत्तसेवा :
अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता या गावातील शुभांगी संतोष शिंदे (२६) या विवाहितेने सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीमुळे राहत्या घरी लोखंडी अँगलला स्कार्फ बांधून गळफास घेऊन गुरुवारी (दि.५) आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
तिसरे ऑप्टिकलचे दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी माहेराहून पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप मृत शुभांगीच्या माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे. अंबाजोगाई व धारूर येथे ऑप्टिकलचे दुकान असताना तिसऱ्या दुकानासाठी शुभांगीकडे सासरच्या मंडळींकडून चारंचार पैशाची मागणी केली जात होती. या अगोद रही माहेरच्या लोकांनी पाथ लाख रुपये दिले असताना आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगी शिदे हिचा छळ सुरूच होता, असे फिर्यादींनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सुरुवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी चालढकल केल्याचा आरोप मृत शुभांगीच्या माहेरील मंडळींनी केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने रात्री उशिरा फिर्यादी प्रदीप रुस्तुम सोळुंके यांच्या फिर्यादीवरून शुभंगीचा पती संतोष विलास शिंदे, सासरा विलास बंकट शिंदे, सासु सुमन विलास शिंदे, नणंद सीमा विलास शिंदे रा सर्व जण गीत्ता, ता. अंबाजोगाई तसेच संदीप काचगुंडे (रा. आसरडोह, ता. धारूर) यांच्याविरुद्ध बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभांगी शिंदेच्या मृतदेहाचे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या पार्थिवावर गित्ता येथे काल गुरुवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक कदम तसेच सहायक पोलिस निरीक्षक ससाणे करत आहेत.
दरम्यान शुक्रवार अंबाजोगाई न्यायालयात हजर केले असता मृत शुभांगी शिंदेचा पती, सासू सासरा व नणंद या चौघांना सोमवार दि. ९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर संशय आहे, अशा सर्व आरोपींवना ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.