Beed Crime News pudhari photo
बीड

Beed Crime : वडिलांच्या मित्राने केले मुलीसोबत कुकर्म

माजी सरपंचावर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

आष्टी ः वडिलांच्याच मित्राकडून अल्पवयीन मुलीवर गत चार महिन्यांपासून अत्याचार करण्यात येत होता. यातून त्या मुलीला दिवस गेल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नराधम माजी सरपंच नवनाथ आयंदे याच्या विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी नवनाथ आयंदे आणि अल्पवयीन मुलीचे वडील एक मित्र आहेत. त्यामुळे तो सतत पिडीतेच्या घरी येत असे. शिवाय दोघांचे शेत ही जवळ जवळ असल्याने तो शेतातही येत. पीडितेची नुकतीच 12 वी झाली असून, ती शेतीकामात वडिलांना मदत करत होती.

साधारण चार महिन्यांपूर्वी पीडित तरुणी शेतात केळीला पाणी देत असताना आरोपीने तिच्या शेतात येऊन तिला पैशाचे आमिष दाखवत शरीर संबध ठेवण्याची मागणी केली होती. यावर पीडितेने नकार ही दिला होता. मात्र तरीही जबरदस्तीने त्याने शरीर संबंध ठेवले. त्यानंतर ही वारंवार शरीर संबंध ठेवल्याने पीडित तरुणीच्या पोटात दु:खले.

वडील व तिचा मावस भाऊ यांनी तिला माजलगाव येथे एका खासगी दवाखान्यात नेले. त्याठिकाणी सोनोग्राफी केल्यानंतर सदर तरुणी चार महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्याने डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यात पाठवले. त्यानंतर वडिलांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता नवनाथ आयंदे यांनी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याचे तरुणीने सांगितले. या प्रकरणी प्रथम माजलगाव येथे गुन्हा दाखल करून तो आष्टी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास आष्टी पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT