Alandi crime | आळंदीत महिलेवर सामूहिक बलात्कार, दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एका महिलेसह सातजणांवर गुन्हा दाखल, संशयितांकडून विकृत कृत्‍य
Aalandi crime | आळंदीत महिलेवर सामूहिक बलात्कार, दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Aalandi crime | आळंदीत महिलेवर सामूहिक बलात्कार, दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलfile photo
Published on
Updated on

पिंपरी : घरात घुसून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत एका महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात उघडकीस आला आहे. हा प्रकार ७ एप्रिल २०२६ रोजी तसेच त्यापूर्वी चार ते पाच महिन्यांपूर्वी दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने २४ एप्रिल २०२६ रोजी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल सुरेश चोरडीया, कानीफनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे तसेच एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी संशयित आरोपी पीडितेच्या घरात घुसले. त्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. त्यानंतर पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच तिला शिवीगाळ करून, “हे घर आमच्या नावावर कर, अन्यथा घर विकून आम्हाला पैसे दे. नाहीतर तुला असाच त्रास देत राहू,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेच्या चार ते पाच महिन्यांपूर्वीदेखील संशयित पीडित महिलेच्या घरी आले होते. त्यावेळीही त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, पीडित महिलेने खाण्यासाठी बनविलेल्या भाताच्या पातेल्यात एका संशयिताने लघुशंका केल्याचाही धक्कादायक आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर तिसऱ्या दिवशी संशयित पुन्हा पीडितेच्या घरी गेले. मात्र, पीडितेने दरवाजा न उघडल्याने त्यांनी शिवीगाळ केली. तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news