Beed Politics : मंत्री पंकजा मुंडे यांचा जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव File Photo
बीड

Beed Politics : मंत्री पंकजा मुंडे यांचा जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव

पहिल्यांदाच थेट भाष्य : सामाजिक सौहार्दासाठी पुढाकार घेऊ

पुढारी वृत्तसेवा

Minister Pankaja Munde's friendship proposal to Jarange

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा मनोज जरांगे यांच्या विरोधात आपण कधीही वक्तव्य केलेले नाही. कधी कधी आपल्या बोलण्याचे चुकीचे अर्थ काढले जातात आणि तेच समोरच्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने दाखवून - गैरसमज व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आता सर्वांना सोबत घेऊन सामाजिक सौहार्दासाठी आपण पुढाकार घेणार आहोत, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले असून, जरांगे यांनी दीपावली च्या शुभेच्छा देत मैत्रीचा हात पुढे केला आहे.

पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत परळी वैजनाथ येथे दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांशी मनमोकळा संवाद - साधताना मुंडे यांनी गेल्या अनेक दिवसांपासूनच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य ॥ केले. यामध्ये त्यांनी मराठा आरक्षण, मनोज जरांगे यां च्यावर भाष्य केले. आपण सगळे मिळून समाजात सौहार्द निर्माण करू, पण चुकीचे होत असेल तर समर्थन करणार नाही. एखाद्या समाजाला न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु त्यांना काही लोक चुकीचे अर्थ दाख वून आपली प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न करतात. गुलामीचं गॅझेट, गुलामाची औलाद असे आपण कधीच पर म्हटलेले नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाला आपण सातत्याने पाठिंबाच दिलेला असल्याचे सांगत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका घेतली होती तीच भूमिका आपण सातत्याने मांडली व त्या भूमिकेवर आपण कायम राहिलो. मराठा समाजाला निश्चितपणाने आरक्षण द्या मात्र ओबीसीला धक्का न लागता हे आरक्षण दिले जावे अशी आपली जाहीर भूमिका राहिलेली आहे. दरम्यानच्या काळात अनेक वेळा टीका टिप्पण्या झाल्या मात्र आपण कधीही, कोणाबद्दलही वाईट बोललेलो नाही. मनोज जरांगे यांच्या बाबतीतही आपण कधीही वाईट वक्तव्य केलेले नाही. किंवा त्यांच्या टीकाटिप्पणी केली नाही. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी जरांगे लढत असताना ते राजकारणातही नाहीत. त्यामुळे एखाद्या समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीबद्दल वाईट वक्तव्य आणि टीकाटिप्पणी करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

जालन्याच्या पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी सुरू असलेल्या उपो षणांना भेट देणे ही आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आपण धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते, त्याचबरोबर बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना भेटलो व कायद्याच्या चौकटीत जे शक्य असेल ते प्रामाणिकपणे करण्याचा शब्द आपण सरकारच्या वतीने त्यांना दिला. संविधानाने दिलेल्या हक्कानुसार व कायद्यानुसार प्रत्येक अन्याय झालेल्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही मुंडे साहेबांची भूमिका होती तीच आपली ही भूमिका आहे. ती सातत्याने मांडली आहे. त्यामुळे एखाद्या समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणे हे आपले संस्कार नाहीत. त्यामुळे जरांगे यांना सुद्धा मी दिवाळीच्या शुभेच्छा देते, पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

आर्थिक अडचणीत असलेले अनेक कारखाने बंद असून अनेक वर्षांपासून त्यांना गंज लागलेला आहे. मात्र आपण तसे न होऊ देता शेतकऱ्यांचे हित कशात आहे? या दृष्टिकोनातून निर्णय घेतला. काही लोक जाणीवपूर्वक व विनाकारण मुंडे साहेबांचा आत्मा, मुंडे साहेबांचे अपत्य विकलं वगैरे टीकाटिप्पणी करताना दिसतात. मात्र कारखाना विकला नसुन आपण मुंडे साहेबांचे हे चौथे अपत्य जगविले असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT