

केज :- केज तालुक्यात भर दिवसा घराचे लोखंडी गेट तोडून आतील पेटी व धान्याच्या कोठीत ठेवले २७ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञ यांच्या पथकाने भेट दिली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील कोरेगाव येथील वैतागवाडी नावाच्या वस्तीवर राहत येथे दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:१५ ते ५:३० वा. च्या दरम्यान बळीराम भगवान तांदळे हे आणि त्यांची पत्नी शेतात गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी चॅनल गेटचे कुलुप तोडुन घरात असलेल्या पेटी आणि धान्याच्या कोठीत ठेवलेले आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, सोन्याचा हार, नेकलेस, व अन्य असे दागिने एकूण २७ तोळे ४ ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले. ज्याची किंमत ५ लाख ८१ हजार ५०० रु दागिन्यांची चोरी झाली आहे.
बळीराम तांदळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ५८२/२०२५ भा. न्या. सं. ३०५(ए), ३३१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे तपास करीत आहेत.
श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ :- घटनास्थळी पोलिसांचे श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञ यांनी भेट देऊन पुरावे हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी आयपीएस तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकट राम यांनी भेट देऊन तपासा संदर्भात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.