Crime News  Pudhari
बीड

Beed Crime News : महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीवर मिनी मकोका

गेवराईजवळ परराज्यातील प्रवाशांना मारहाण करत साडेतीन लाखांचे दागिने केले होते लंपास

पुढारी वृत्तसेवा

Mini MCOCA on highway robbery gang

बीड, पुढारी वृत्तसेवा : गेवराई शहर ाजवळील शिवशारदा शाळेजवळ थांबलेल्या गाडीतील प्रवाशांना मारहाण करत धाक दाखवून ३ लाख ४६ हजार रुपयांचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. दि.४ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या या घटनेतील आरोपी विरोधात आता पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांनी मिनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

सोलापूर-धुळे महामार्गावर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात प्रवाशांना लूटण्याच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये दि. ४ डिसेंबर रोजी खासगी गाडीने शिर्डी येथे जात असलेल्या शिवप्रसाद पौने (रा. तेलंगणा) हे सोलापूर-धुळे महामार्गावर गेवराईपासून काही अंतरावर असलेल्या शिवशारदा शाळेजवळ काहीवेळ थांबले होते.

यावेळी तेथे आलेल्या अज्ञात चोरट्यांनी अचानकपणे हल्ला करत लोखंडी रॉडचा धाक दाखवून प्रवाशांकडील ३ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. या प्रकरणात पोलिसांनी राहुल अनिल काळे, विकास अनिल काळे व अनिल रामा काळे या बापलेकांना वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथून दि.१२ डिसेंबर रोजी अटक केली होती.

त्यांच्याकडून ४ लाख २९ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दगिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. तसेच गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. यातील टोळी प्रमुखाने संघटीत गुन्हेगारांची टोळी तयार करुन संघटीतरित्या बीड जिल्ह्यात पाच गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे गुन्हे शस्त्राचा धाक दाखवून आर्थिक फायद्यासाठी गेल्याचे समोर आले असून त्यानुसार पोलिस अधिक्षक नवनित कावत यांनी गेवराई पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात मिनी मकोका लावण्याची पवानगी पोलिस निरीक्षकांना दिली आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नवनित कावत, अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर पवार, सपोनि अण्णासाहेब पवार, कल्याण राठोड, कांबळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अभिमन्यु औताडे, विभीषण चव्हाण, शेख अलिम यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT