MLA Babanrao Lonikar : नागरिकांच्या समस्या निकाली काढाव्यात

शिबिरस्थळी आमदार बबनराव लोणीकर यांचे निर्देश
MLA Babanrao Lonikar
MLA Babanrao Lonikar : नागरिकांच्या समस्या निकाली काढाव्यातfile photo
Published on
Updated on

MLA Babanrao Lonikar: Citizens' problems should be resolved

आष्टी, पुढारी वृत्तसेवा : महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा या शिविरांचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांच्या प्रलंबित महसुली प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करून शक्य तितक्या समस्या शिबिरस्थळीच निकाली काढाव्यात, असे निर्देश आ. बबनराव लोणीकर यांनी दिले.

MLA Babanrao Lonikar
Marriage Fraud Gang | महिनाभरात तीन लग्नंः उतावळ्या नवऱ्या मुलांना फसवणाऱ्या टोळीतील महिलाच लग्नाला कंटाळली, चौथ्याची तयारी चालल्याने महिलेने घेतले विष!

'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' या अभियानाची सुरुवात शनिवार (दि. ७) रोजी आष्टी (ता. परतूर) येथे करण्यात आली. यावेळी आ. बबनराव लोणीकर बोलत होते. शिबिरांचे उद्घाटन माजी मंत्री तथा आ. बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपविभागीय अधिकारी गायकवाड, तहसीलदार पद्माकर दामोधर जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, गटविकास अधिकारी राजेश तांगडे, तालुका कृषी अधिकारी देवानंद सांगवे, ग्राम विकास अधिकारी डी.बी.काळे यांची उपस्थिती होती. या वेळी विविध खात्या अंतर्गत राबविण्यात आलेल्या सेवांचा ५१३ लाभार्थीनी लाभ घेतला.

MLA Babanrao Lonikar
Beed Crime | कारचा पाठलाग करून चाकू हल्ला: एक गंभीर जखमी; मोबाईलसह रोख रक्कम लुटली

शिबिरा दरम्यान सातबारा अभिलेखा वरील दुरुस्ती, प्रलंबित फेरफार, नोंद दुरुस्ती, लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रमाणपत्रे, डिजिटल सातबारा ई-मोजणी, ई-फेरफार, पीएम किसान, अॅग्री स्टॅक, तक्रार निवारण, भूसंपादन, अकृषिक जमिनीचे प्रकरणे, तुकडेबंदी, तसेच अकृषिक परवानगीसंदर्भातील नोंदी अद्ययावत करणे यासह विविध कामे करण्यात येणार असल्याचे शिबीर प्रसंगी नियोजन झाले.

शिबीरास तुकाराम सोळंके, सरपंच मधूकर मोरे, उपसरपंच नसरूल्ला खॉन, काकड लोणी येथील सरपंच गजानन लोणीकर, अमोल जोशी, बाबाराव थोरात, आसीफ कच्छी, मुजीबभाई, बकंठ सोळंके, माणीकराव वाघमारे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

विविध योजनांची माहिती दिली

जमीन नोंदी, फेरफार, वारसा नोंद, उत्पन्न व जातीचे दाखले, तसेच विविध शासकीय योजनांबाबतची माहिती आणि लाभ यासंदर्भातील प्रश्नांचे निराकरण प्राधान्याने करण्यात यावे, असे उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news