Beed Crime News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले File Photo
बीड

Beed Crime News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले

सासरकडील तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Married woman ends life after being harassed by in-laws

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील राजुरी मळा येथे सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी सासरकडील तिघांविरुद्ध तलवाडा पोलिस ठाण्यात अखेर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली अनिकेत गर्जे (२२) असे या विवाहितेचे नाव आहे. सोनालीचा जंबुरा वस्ती (ता. गेवराई) येथील अनिकेत याच्याबरोबर दोन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नाला एक महिना होत नाही तोच पती, सासू व सासरे यांनी माहेरकडून पिकअप खरेदीसाठी पाच लाख रुपये आण म्हणून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला याची माहिती सोनालीने आई वडिलांना दिली.

सोनालीच्या माहेरकडून ही रक्कम देण्यात आली, तरीही तिच्यावर अत्याचार सुरूच राहिले. मला तू आवडत नाहीस, तुझ्यासोबत राहायचं नाही, असे सांगत नवऱ्यासह सासरच्यांनी वारंवार त्रास देत असल्याने अखेर ३१ ऑगस्ट रोजी ती अचानक बेपत्ता झाली. शोध घेतला असता घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, माहेरच्या मंडळींमध्ये हळहळ पसरली आहे. दरम्यान, प्रारंभी तलवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल केल्यानंतरच मंगळवारी मृत सोनाली हिची आई दैवशाला वनवे यांच्या तक्रारीवरून पती अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे आणि सासू प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तलवाडा पोलिस करत आहेत. दरम्यान, वारंवार घडवणाऱ्या हुंडाबळीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा संताप व्यक्त होत आहे.

सोनाली हिचा दोन महिन्यांपूर्वीच अनिकेत याच्याशी विवाह झाला होता. तसेच तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT