Beed Crime: लाखो रुपयांची रोकड लुटणाऱ्यांना केज पोलिसांनी घेतले ताब्यात

Beed police action on cash robbery: या घटनेनंतर, केज पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
Beed Crime
Beed CrimePudhari Photo
Published on
Updated on

केज: केज येथे एका ऊसतोड मुकादमाच्या हातातील चार लाख रुपयांची पिशवी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून पळ काढला होता. केज पोलिसांनी या घटनेचा तपास करत आंध्र प्रदेशातील दोन आरोपींना परभणी येथील कारागृहातून ताब्यात घेतले आहे.

२९ जुलै रोजी उत्तरेश्वर धायगुडे (रा. मानेवाडी, ता. केज) हे त्यांचे मेहुणे आणि पुतण्यासोबत चार लाख रुपये घेऊन अंबाजोगाईहून केज येथे आले होते. त्यांना ही रक्कम बँकेत जमा करून नवीन ट्रॅक्टरच्या ट्रॉली खरेदीसाठी पाठवायची होती. बँकेची वेळ संपल्यामुळे ते तिघे मानेवाडीकडे परत जात असताना, सरकारी रुग्णालयाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावली आणि पळ काढला.

या घटनेनंतर, केज पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासामध्ये, जसवंत उर्फ जश्यु शिवा पिटला (वय १८) आणि प्रसंगी उर्फ सन्नी एलिया चल्ला (वय ३३) या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. हे दोन्ही आरोपी आंध्र प्रदेशातील नेल्लोरे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या पथकाने १० सप्टेंबर रोजी परभणी येथील जिल्हा कारागृहातून न्यायालयाच्या आदेशाने त्यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे पुढील तपास करत आहेत. या आरोपींचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news