Beed Crime : चार वर्षांच्या मुलीसह विवाहितेने जीवन संपवले file photo
बीड

Beed Crime : चार वर्षांच्या मुलीसह विवाहितेने जीवन संपवले

बीड तालुक्यातील शिदोड येथील घटना : विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

पुढारी वृत्तसेवा

Married woman ends her life along with her four-year-old daughter

बीड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील शिदोड येथील एका चोवीस वर्षीय विवाहितेने चार वर्षांच्या मुलीला सोबत घेत गावालगतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री घडली, गुरुवारी सकाळी या मायलेर्कीचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

अवंती तुषार शेंडगे (वय 24 वर्ष, रा. शिदोड, ता. जि. बीड) व तन्वी तुषार शेंडगे (वय 4) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. अवंती शेंडगे यांचे माहेर व सासर शिदोड येथेच आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह गावातील तुषार शेंडगे यांच्यासोबत झाला होता. त्यांना तन्वी ही मुलगी होती. बुधवारी रात्री झालेल्या किरकोळ वादानंतर अवंती हीने मुलगी तन्वी हिला सोबत घेत गावालगत तिच्या वडिलांच्या शेताकडे धाव घेतली.

त्या ठिकाणी असलेल्या विहिरीत तिने मुलीला सोबत घेत उडी मारली. याबाबतची माहिती नातेवाईक व कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली, परंतु त्यांना मृतदेह मिळून येत नव्हते. अखेर गुरुवारी सकाळी या दोघी मायलेकींचे मृतदेह मिळून आले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT