Black Market : तरुणीच्या सौंदर्याशी जीवघेणा खेळ; बीडमध्ये बनावट गोरी क्रीमचा काळाबाजार

शहरातील यश सौंदर्य प्रसाधन (अजिजपुरा परिसर) येथे बनावट गोरी क्रीम विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सौंदर्यप्रसाधनांच्या नावाखाली सुरू असलेल्या नकली उत्पादनांच्या व्यवसायाविषयी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
तरुणीच्या सौंदर्याशी जीवघेणा खेळ; बीडमध्ये बनावट गोरी क्रीमचा काळाबाजार
तरुणीच्या सौंदर्याशी जीवघेणा खेळ; बीडमध्ये बनावट गोरी क्रीमचा काळाबाजारfile photo
Published on
Updated on

Black market for counterfeit skin-lightening cream in Beed

बीड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील यश सौंदर्य प्रसाधन (अजिजपुरा परिसर) येथे बनावट गोरी क्रीम विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सौंदर्यप्रसाधनांच्या नावाखाली सुरू असलेल्या नकली उत्पादनांच्या व्यवसायाविषयी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या अधिकृत तपासणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित दुकानाविरुद्ध कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर नकली सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

तरुणीच्या सौंदर्याशी जीवघेणा खेळ; बीडमध्ये बनावट गोरी क्रीमचा काळाबाजार
Beed News | घळाटवाडीच्या सरपंच संगिता येताळ अपात्र; तीन अपत्य प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

तज्ज्ञांच्या मते, बनावट गोरी क्रीममध्ये निकृष्ट दर्जाची व आरोग्यास अपायकारक रसायने वापरली जाण्याची शक्यता असते. अशा क्रीमचा वापर केल्यास चेहऱ्यावर काळे डाग पडणे, त्वचा जळणे, तीव्र अलर्जी, कायमस्वरूपी डाग, त्वचेचे विकार आणि काही गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः आकर्षक पॅकिंग व कमी किमतीच्या आमिषाला बळी पडणाऱ्या तरुणी व महिलांच्या आरोग्याशी हा थेट खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांनी संबंधित दुकानावरच नव्हे तर अशा बनावट उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांपर्यंत तपास पोहोचवून संपूर्ण साखळी उघड करण्याची मागणी केली आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यावर कारवाई करून थांबू नये, तर नकली माल तयार करणारे कारखाने, पुरवठादार आणि वितरक यांच्यावरही कठोर फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

तरुणीच्या सौंदर्याशी जीवघेणा खेळ; बीडमध्ये बनावट गोरी क्रीमचा काळाबाजार
Gujarat Flood: गुजरातमधील पुरात अडकलेल्या ३५ पर्यटकांमध्ये परळीतील दाम्पत्य; हेलिकॉप्टरद्वारे सुखरूप सुटका

ग्राहक संघटनांनीही नागरिकांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्याचे, उत्पादनावरील बॅच क्रमांक, एमआरपी, उत्पादकाची माहिती आणि गुणवत्ता चिन्ह तपासण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद किंवा अत्यल्प किमतीत मिळणारी उत्पादने वापरणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे शहरातील इतर सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांचीही अन्न व औषध प्रशासन, पोलिसांनी तपासणी करावी, नकली सौंदर्यप्रसाधनांच्या रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर शिक्षा करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news