Accident News : धारूर चौकात भीषण अपघात; टिप्परखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

केज शहर हादरले; चालक पोलिसांच्या ताब्यात, घटनेनंतर वाहतूक काही काळ विस्कळीत
Accident News : धारूर चौकात भीषण अपघात; टिप्परखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
Published on
Updated on

Accident News: Horrific accident at Dharur Chowk; youth crushed to death under a tipper truck

केज, पुढारी वृत्तसेवा : केज शहरातील धारूर रोडवरील भवानी चौकात गुरुवारी (दि. २३) सकाळी झालेल्या भीषण अपघातात टिप्परच्या मागील चाकाखाली चिरडून एका ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Accident News : धारूर चौकात भीषण अपघात; टिप्परखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
देवगाव रंगारी-देवळाणा रस्ता गेला खड्यात, वाहनधारकांचे बेहाल

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन आदिनाथ चाटे (वय ३५, रा. तांबवा, ता. केज) हे मोटारसायकल (जीए ०३/एए ८१२८) वरून तांबवा येथून - केज मार्ग येत होते. त्याचवेळी धारूरकडून मुरुमाने भरलेला टिप्पर (एमएच ४४/यू ९९७१) अंबाजोगाईकडे जाण्यासाठी भवानी चौकात डावीकडे वळत असताना - मोटारसायकलला धक्का लागला. धक्क्यामुळे नितीन चाटे हे खाली पडून टिप्परच्या मागील चाकाखाली आले. टिप्परचा टायर त्यांच्या कमरेवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या हृदयद्रावक दृश्यामुळे उपस्थित नागरिकही हादरून गेले. घटनेनंतर चौकात उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे सय्यद माजेद यांनी तत्परता दाखवत मृतदेहावर कपडा टाकला, पोलिसांना माहिती दिली तसेच टिप्पर चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले.

Accident News : धारूर चौकात भीषण अपघात; टिप्परखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
Saint Janabai : 'विठू माझा लेकुरवाळा' च्या संत जनाबाई गंगाखेडच्या!

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, बाळासाहेब रोडे, शकील शेख, हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, सिद्दिक शहा, त्रिंबक सोपने, नितीन वारे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.

वारंवार अपघात होणारा चौक

भवानी चौकात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून यापूर्वीही येथे अपघात घडले आहेत. त्यामुळे या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल, गतिरोधक, सीसीटीव्ही आणि वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news