बीड

Manoj Jarange-Patil: मुंबईला येऊन मराठ्यांनो संधीचे सोनं करा : मनोज जरांगे- पाटील

अविनाश सुतार

गेवराई : पुढारी वृत्तसेवा: मराठ्यांना आता आरक्षणापासून कोणीच रोखू शकत नाही. मराठ्यांनी आरक्षणाची ८० टक्के लढाई जिंकली आहे, नोंदी मिळाल्यात आत्ता फक्त सरसकट आरक्षणासाठीची ही लढाई सुरु आहे. त्यासाठी मराठा बांधवांनो २० जानेवारीला शांततेत मुंबईला जायचे आहे. ताकदीने तयार रहा. लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकायची हीच खरी वेळ आहे, असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेत मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि.१४) केले.  Manoj Jarange-Patil

गेवराई शहरासह निपाणी जवळका, खांडवी, रानमळा, भाटेपुरी, अर्धमसला येथे जरांगे- पाटील यांनी भेटी देवून सिरसदेवी येथे आज दुपारी ५ वाजता जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करुन जेसीबीतून फुलांची उधळण करत ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले.Manoj Jarange-Patil

ते पुढे म्हणाले की, आपल्या धसक्याने समिती पुन्हा कामाला लागली आहे. मराठवाड्यातील एकही जिल्हा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. परंतु सरसकट आरक्षणासाठीची लढाई सुरु झाली आहे. मी कुणालाही मॅनेज होत नाही, कारण मी माझ्या जातीशी गद्दारी करु शकत नाही. तुम्ही फक्त एकजुट ठेवा. मराठा आरक्षणासाठीच्या लढाईसाठी संधीचे सोने करा. आपले गाव आणि परिसर पिंजून काढत सर्वांना मुंबईला येण्यासाठी कळवा, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT