Manoj Jarange Patil ED pudhari
बीड

Manoj Jarange Patil ED: मनोज जरांगेच्या सहकाऱ्यांवर ED चौकशीच्या वादळाचे सावट... गुप्तचर स्तरावर चौकशी सुरू

आर्थिक अनियमिततेच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, तक्रारदारांचे जबाब नोंदवून पुरावे आणि कागदपत्रे मागवली जात आहेत.

Anirudha Sankpal

Manoj Jarange Patil ED Inquiry : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांबाबत ED कडून उच्चस्तरीय गोपनीय चौकशी सुरू झाली आहे. आर्थिक अनियमिततेच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, तक्रारदारांचे जबाब नोंदवून पुरावे आणि कागदपत्रे मागवली जात आहेत.

तक्रारींची माहिती मागवली

आयकर विभागासह अन्य सरकारी यंत्रणांकडून संबंधित तक्रारी आणि आर्थिक नोंदींची माहिती मागवण्यात आली आहे. बीडमधील कार्यकर्ते अमोल सुखदेव खुणे यांच्या तक्रारीत जरांगे आणि अन्य चार व्यक्तींच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सरकारी कंत्राटे अन् वाळू व्यवसाय

बेहिशेबी मालमत्ता, संशयित बेनामी मालमत्ता, सरकारी कंत्राटे आणि आर्थिक व्यवहार यांच्यावर तपास यंत्रणांचे लक्ष असणार आहे. आंदोलनावरील खर्च, जमीन खरेदी-विक्री, वाळू व्यवसाय आणि विविध सरकारी विभागांच्या कंत्राटांचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

आकडा शेकडो कोटींचा मात्र..

संबंधित आर्थिक व्यवहार १०० ते २०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असल्याचा तक्रारदाराचा दावा आहे. मात्र हा आकडा स्वतंत्रपणे सिद्ध झालेला नाही. सध्या ED ची चौकशी T-1 गुप्तचर स्तरावर असून, अद्याप ECIR दाखल नाही किंवा मनी लाँड्रिंगचा औपचारिक गुन्हा नोंदवलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT