Man who stole tractor in Revenue Department's custody put behind bars
गेवराई पुढारी वृत्तसेवा : अवैध वाळू ता. ही वाहतूक करणारा ट्रॅक्टर व छोटा टेम्पो महसूल विभागाने पकडून त्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. ही वाहने गेवराई एसटी बसच्या आगारामध्ये ठेवण्यात आली होती, त्यातील ट्रॅक्टर चोरी गेल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्यांना अटक केली आहे.
पोलीस ठाणे गेवराई येथे फिर्यादी चंद्रकांत बाबुराव तलाठी सज्जा हिंगणगाव तालुका गेवराई यांनी दिनांक 29 जुन रोजी फिर्याद दिली होती की महसूल पथकाने हिंगणगाव शिवारात अवैध वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली व छोटा हत्ती असे वाहन वाळूसह ताब्यात घेऊन दोन्ही वाहने गेवराईतील आगारात उभी करण्यात आली होती.
28 जून रोजी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास गेवराई आगारातून स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर व ट्रॉली सह चोरून घेऊन गेले म्हणून पोलीस ठाणे गेवराई येथे विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेवराई पोलिसांनी पथक तयार करून फिर्याद प्राप्त होताच आरोपीचा शोध घेतला असता दिनांक 29 जून रोजी पुण्यातील चोरीस गेलेला ट्रॅक्टर ट्रॉली सह पुण्यातील आरोपीस 24 तासाच्या ताब्यात घेतली असून या गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस हवालदार कल्याण राठोड हे करत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल कुमार लांडगे, समाधान दौंड, अशोक हंबर्डे, कल्याण राठोड, गोरक्ष डोके सह पोलीस कर्मचारी यांनी केले.