Beed crime | डिघोळअंबा शिवारात तलावातून मुरूम उत्खनन करताना 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडले

युसुफवडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांची कारवाई
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : युसुफवडगाव पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा शिवारातील पाझर तलावातून मुरूम उत्खनन करताना छापा मारला. यावेळी २४ लाख रुपयांचे तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडले आहेत. या प्रकरणी तिघा ट्रॅक्टर चालकांसह जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Crime News
Dombivli Massage Parlour Raid : डोंबिवलीमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलची मोठी कारवाई

अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा शिवारातील पाझर तलावातून जेसीबीच्या साहाय्याने मुरूम उत्खनन करून ट्रॅक्टरमध्ये भरून चोरटी वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांना मिळाली. त्यावरून सपोनि मांजरमे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह १४ जून रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास छापा मारला. यावेळी जेसीबी चालक हा जेसीबीसह पसार झाला. तर तीन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अर्धवट मुरूम भरलेले आढळून आले. याचवेळी सपोनि मांजरमे यांनी महसुलचे तहसीलदार सचिन देशपांडे यांना छापा मारल्याचे सांगितले. त्यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी सतीश भुसेवाड हे त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहणी करून त्या ठिकाणी अवैद्य मुरुम उत्खनन झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तीन ट्रॅक्टरचे चालक किशोर श्रीराम सोनवणे, मारोती बालासाहेब सोनवणे ( दोघे रा. डिघोळअंबा), रवी धर्मराज माळी (रा. वरपगाव ता. अंबाजोगाई) या तिघांना ताब्यात घेऊन प्रत्येकी आठ लाख रुपये किंमतीचे तीन ट्रॅक्टर (एम एच ४४/ ए ई ००१८), (एम एच ४४/ झेड ४४६१), (एम एच २४/ए जी ३१११) जप्त केले.

Crime News
Honey trap case nagpur सावधान ! तरुणीच्या मिस्ड कॉलला भुलला अन् ४ लाख गमावले; 'हनी ट्रॅप'चे नागपुरात नवे जाळे

ट्रॅक्टर चालकांकडे त्यांच्या ताब्यामधील ट्रॅक्टरच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता कागदपत्रे मिळाली नाहीत. तर मुरुम उत्खनन व वाहतुकीचा शासकीय परवाना मिळून आला नाही. पोलीस शिपाई धनंजय कारले यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक किशोर सोनवणे, मारोती सोनवणे, रवी माळी या तिघांसह अनोळखी जेसीबी चालक मालका विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार रामनाथ वारे हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news