Sambhajinagar Crime News : गावगुंडाने भररस्त्यात पोलिस अधिकाऱ्यावर टाकला हात

ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईदरम्यानची घटना
Sambhaji Nagar Crime News
Sambhajinagar Crime News : गावगुंडाने भररस्त्यात पोलिस अधिकाऱ्यावर टाकला हातFile photo
Published on
Updated on

Sambhajinagar Crime News: Village Bully Assaults Police Officer in the Middle of the Road

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाची मद्यपी गावगुंडाने भररस्त्यात थेट कॉलर पकडून अश्लील शिवीगाळ करत दमबाजी केली. हा संतापजनक प्रकार समोर गुरुवारी (दि.२८) रात्री आठ वाजेच्या सुमारास शरद टी पॉइंटवर घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित भागवत भारस्कर (३०) आणि आण्णा दादाराव नवल (४५, दोघे रा. जाधववाडी) अशी आर-ोपींची नावे आहेत.

Sambhaji Nagar Crime News
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

सिडको वाहतूक शाखेचे अंमलदार कैलास पंडीत यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री शरद टी पॉईंटवर सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) हरेश्वर घुगे, हवालदार कदम, अंमलदार पचलोरे, सोनवणे, डोईफोडे, गायकवाड असे पथक ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत होते. तीन रिक्षांवर कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या.

तेवढ्यात तिथे कार (एमएच-२०-ईवाय-१२६४) चालक रोहित भारस्कर हा गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून होता. पोलिसांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, अशी अरेरावी त्याने केली. संशय आल्याने एपीआय घुगे यांनी त्याची ब्रेथ अॅनालायझरवर तपासणी केली असता, त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.

Sambhaji Nagar Crime News
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

तुला बघून घेतो म्हणत थेट कॉलर पकडली

लायसन्स विचारले असता भारस्करने मोबाईलमध्ये दाखविले. एपीआय घुगे हे लायसन्सची माहिती मोबाईलवरून बघून नोंदवत असताना त्याने स्वतःचा मोबाईल हिसकावून घेत वाद घातला. त्याला समज देण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट घुगे यांना शिवीगाळ केली आणि त्यांची कॉलर पकडली.

तू मला ओळखत नाही, तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने आणि त्याचा साथीदार आण्णा नवल याने पोलिसांशी झटापट करून रस्त्यावर आरडाओरड करत राडा केला.

संपूर्ण प्रकार बॉडी कॅमेऱ्यात कैद

या सर्व घटनेच्या वेळी एपीआय घुगे यांच्या गणवेशावरील बॉडी कॅमेरा ऑन होता. त्यामुळे आरोपीने केलेली अरेरावी, दिलेली शिवीगाळ, कॉलर पकडल्याचा प्रकार आणि पोलिसांशी केलेली झटापट हा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राठोड करत आहेत.

अर्ध्या तासाने पोहोचले सिडको पोलिस !

काही महिन्यांपूर्वी हायकोर्ट सिग्नलवर असाच वाहतूक पोलिसांना मारहाणीचा प्रकार घडला होता. तेव्हा पुंडलिकनगर पोलिसांना पोहोचायला अर्धा तास लागला होता. तोच संतापजनक प्रकार इथेही घडला. भररस्त्यात राडा करणारे दोन्ही आरोपी ऐकत नसल्याने अंमलदार सोनवणे यांनी नियंत्रण कक्षाला वायरलेसवरून संपर्क करून तातडीने मदत मागितली. मात्र सिडको पोलिसांची गाडी तब्बल अर्ध्या तासाने पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले. काही वेळात हसूलचीही पीटर मोबाईल तिथे आली. भररस्त्यात वर्दीतल्या पोलिसांनाच वेळेत मदत मिळत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा संतप्त सवाल या घटनेने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news