Beed Crime News : डॉक्टरला मारहाण करणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा Pudhari File Photo
बीड

Beed Crime News : डॉक्टरला मारहाण करणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

गेवराई उपजिल्हा रुग्णालयात घडली होती घटना

पुढारी वृत्तसेवा

Man who assaulted doctor gets three years in prison

बीड, पुढारी वृत्तसेवा : उपजिल्हा रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गेवराई येथील राहुल अदिनाथ बांगर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच विविध कलमांतर्गत एकूण 8 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

8 जून 2016 रोजी उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे फिर्यादी डॉक्टर अपघात विभागात रात्रपाळीचे कर्तव्य बजावत होते. रात्री सुमारे 11.30 वाजता विषबाधा झालेल्या गंभीर महिलेवर उपचार सुरू असतानाच आणखी एक रुग्ण दाखल झाला. त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी आमच्या रुग्णावर आधी उपचार करा, असा आग्रह धरला. डॉक्टरांनी दोन्ही रुग्णांवर उपचार करणार असल्याचे सांगून काही वेळ देण्याची विनंती केली.

याच दरम्यान आरोपी राहुल बांगर हा अपघात विभागात घुसला. त्याने डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, कमरेला असलेल्या चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक ए. टी. मालुसरे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले. फिर्यादी डॉक्टर, अन्य वैद्यकीय अधिकारी, पंच, तपास अधिकारी आदींच्या साक्षी व दस्तऐवजी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे निष्पन्न केले. न्यायालयाने आरोपीला वेगवेगळ्या कलमानुसार तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. बी.एस. राख यांनी प्रभावी बाजू मांडली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल ऋषीकेश सानप व एलपीसी एस. ए. चव्हाण यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT