Beed News : मिस्तरीचा मुलगा झाला क्लास वन अधिकारी  File Photo
बीड

Beed News : मिस्तरीचा मुलगा झाला क्लास वन अधिकारी

गेवराई : खडतर परिस्थितीतून मिळवले नेत्रदीपक यश

पुढारी वृत्तसेवा

Krishna Shinde secured 30th rank from Maharashtra in the general merit list in the MPSC examination

गजानन चौकटे

गेवराई : जेमतेम शेती, त्यावर उदरनिर्वाह होत नसल्याने मिस्तरीचा व्यवसाय करून आपल्या मुलाचा शिक्षणाचा खर्च भागत नसताना अक्षरशः एक एकर शेती विकून खर्च केला आणि शिंदेवाडी येथील मुलगा कृष्णा शिंदे हा ९ मे २०२५ रोजी एमपीएससी स्पर्धा परीक्षेत सर्वसाधारण गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून ३० वा नंबर त्यांनी मिळवला आहे. त्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

गेवराई तालुक्यातील शिंदेवाडी एक हजार लोकसंख्या असलेल्या गावात बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक असल्याने उदरनिर्वाहासाठी ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. याच गावात कृष्णा बंडू शिंदे याचे प्राथमिक शिक्षण शिंदेवाडी येथील शाळेत झाले.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या प्रमाणे या शाळेतील शिक्षकांनी हा मुलगा हुशार असून त्याला पुढील शिक्षणासाठी इतर ठिकाणी बाहेर पाठवा असे त्यांनी पालकांना सांगितले मात्र घरची परिस्थिती ही बेताची असल्याने मुलाला पाठवले तर त्याचा खर्च कसा होईल याची चिंता कृष्ण शिंदे यांच्या वडिलांना होती. परंतु मुलगा शिकून मोठा झाला तर आपले पांग फेडीन या विचारातून त्यांनी आहे त्या जमिनीतून एक एकर जमीन विकून त्याचे शिक्षण पूर्ण केले.

अत्यंत मेहनत घेऊन त्याने सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले. यावेळी कृष्णाची काका, मार्गदर्शक असलेले डॉ अनिल दहिफळे, व मित्रांनी स्पर्धा परीक्षेची तयारीला लाग असा सल्ला दिला.

त्याने अगदी कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास केला. पुणे येथे अभ्यास केला पहिल्या वेळी यश मिळाले नाही. नंतर पुन्हा झटून अभ्यास केला. आणि २०२१ मध्ये झालेल्या परीक्षेत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखतेत यश मिळवले व तीन वर्षानंतर २०२४ मध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी २ साठी बाभळी पाटबंधारे उपविभाग उंबरी जिल्हा नांदेड येथे निवड झाली.

मात्र याही पेक्षा अधिकचे यश कृष्णा शिंदे यांना अपेक्षित असल्याने त्यांनी पुढे अभ्यास सुरु ठेवून सन २०२५ जानेवारी मध्ये झालेल्या परीक्षेत मुख्य परीक्षा, तोंडी परीक्षा व मुलाखत या मध्ये कृष्णाचा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ( महाराष्ट्र लोकसेवा आयोग) ३० वा नंबर आला असून आता त्याची सहायक कार्यकारी अभियंता श्रेणी एकसाठी निवड झाली आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

माझ्या यशात आई, वडील, भाऊ, बहीण, काका, काकी डॉ. अनिल दहिफळे यांचा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व सामाजिक स्थान उंचावण्यासाठी अभ्यास हा कमी खर्चाचा मार्ग आहे, कुठलेही यश मिळवण्यासाठी कामामध्ये सातत्य व संयम असला पाहिजे.
कृष्णा शिंदे सहायक कार्यकारी अभियंता श्रेणी एक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT