

Elections taluka chiefs, Yuva Sena, Shiv Sena assembly chiefs, vacant year announced
परमेश्वर पालकर
कळंब : गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या तालुकाप्रमुखासह युवा सेना, शिवसेना व विधानसभा प्रमुखांच्या निवडी बुधवारी जाहीर करण्यात आल्या. कळंब तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिव सेनेत अगोरदच पडलेली फूट आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी शिंदे सेनेची धरलेली वाट त्यामुळे अनेक पदे उबाठा मध्ये रिक्त होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना कोणत्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार याबाबत शिवसैनिकामध्ये चर्चा होती. परंतु खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करणारेच शिलेदार निवडले अशी भावना शिवसैनिकात दिसुन येत आहे. या निवडीमध्ये कळंब तालुक्याचा प्रादेशिक समतोल साधत व जुन्या नव्यांचा मेळ घातलेला दिसून येत आहे.
यामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून डिकसळचे माजी उपसरपंच सचिन काळे, तर युवा सेनेचे तालुकाप्रमुख पाथर्डी येथील तरुण कार्यकर्ते पंडित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा समन्वयक म्हणून माजी तालुकाप्रमुख रामलिंग आवाड तर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून माजी युवा सेनेचे तालुकाप्रमुख मनोहर धोंगडे यांची निवड करण्यात आली आहे.
तर सेनेचे उपतालुकाप्रमुख भारत सांगळे यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कळंब शहर निवडणूक प्रभारी म्हणून संजय मुंदडा यांना नियुक्ती दिली आहे. सौंदणा येथील युवक संदीप पालकर यांची युवा सेना उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भगवान बांगर यांची जिल्हा सहसंघटक, गोविंद चौधरी विधानसभा समन्वयक, समाधान बाराते विधानसभा संघटक शशिकांत पाटील तालुका संघटक, आकाश पवार तालुका समन्वयक, मेघराज मुंडे तालुका चिटणीस, नदिम मुलांनी तालुका सचिव, अमृत जाधव विधानसभा युवा अधिकारी तर शुभम करंजकर युवा अधिकारी कळंब पदी नियुक्ती देण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या सर्व पदाधिकारी यांचे दिवसभरात सोशल मीडियावर व वैयक्तिक अभिनंदन सुरू होते. नव्याने जबाबदारी घेतलेले पदाधिकारी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आपले अस्तित्व सिद्ध करणार का हे येणाऱ्या काळातच दिसून येईल.