पाटबंधारे कार्यालय परळीतच ठेवा (File Photo)
बीड

Dhananjay Munde : पाटबंधारे कार्यालय परळीतच ठेवा

आ. धनंजय मुंडेंकडून पाठपुरावा; मुख्यमंत्र्यांना पाठवले होते पत्र

पुढारी वृत्तसेवा

Keep the irrigation office in Parli itself

परळी, पुढारी वृत्तसेवाः पाटबंधारे मंडळ कार्यालय परळीतून जाणार अशा पद्धतीचे दैनिक पुढारीला वृत्त येताच हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत आपण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यालय परळी वैद्यनाथ येथून स्थलांतरित करू नये, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देशही दिलेले आहेत अशी माहिती माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

परळी वैद्यनाथ येथील पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यालय परळी येथून परभणी येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याबाबत दैनिक पुढारीने वृत्त प्रसिद्ध केले आहे, त्याबाबत धनंजय मुंडे यांनी आपण याबाबतीत चार महिन्यापासून पाठपुरावा करत असल्याची माहिती दिली आहे.

परळी वैद्यनाथ येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या माध्यमातून बीड सह लातूर व परभणी जिल्ह्यातील काही भागाचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. या कार्यालयाची स्थापना १९९५ साली करण्यात आलेली असून प्रशासकीय कारणास्तव हे कार्यालय स्थलांतरित करण्याची प्रक्रिया विभागाने प्रस्तावित केली होती.

मात्र या कार्यालयाची इमारत सुस्थितीत असून कामकाज व्यवस्थितपणे सुरू आहे, तसेच तिन्ही जिल्ह्यांच्या कामकाजाच्या हिशोबाने परळी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने हे कार्यालय बंद किंवा स्थलांतरित करण्यात येऊ नये, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी पत्राद्वारे केलेलीआहे, तसेच याविषयी चार महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विनंती केली होती, त्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना हे कार्यालय स्थलांतरित करण्याबाबत निर्देश दिले असून, हे कार्यालय स्थलांतरित करण्यात येऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT