Sugarcane Worker Death File Photo
बीड

Beed News: मुंडेवाडीच्या ऊसतोड मजुराचा सांगलीत मृत्यू; मुकादमाच्या मारहाणीचा नातेवाइकांचा गंभीर आरोप

केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील एका ५५ वर्ष वयाच्या ऊसतोड मजुराचा, सांगली तालुक्यात मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Sugarcane Worker Death

केज : केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील एका ५५ वर्ष वयाच्या ऊसतोड मजुराचा, सांगली तालुक्यात मृत्यू झाला. ऊसतोड मुकादमाने केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी करून ऊसतोड मुजराचा मृतदेह केज पोलिस ठाण्यात आणला होता.

बीड जिल्ह्यातील मुंडेवाडी, ता. केज येथील ऊस तोड मजूर बाबासाहेब गोपीनाथ तोगे यांचा मृत्यू हा दि. १३ रोजी सांगली येथील दवाखान्यात उपचारा दरम्यान झाला. त्यांना ऊस तोडणीच्या कारणावरून दि. ३० ऑक्टोबर रोजी अशोक काशीनाथ केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार व राधाबाई आशोक केदार (सर्व रा. सांगवी ता. केज) या तिघांनी मुंडेवाडी येथे मारहाण करून त्यांना जबरदस्तीने ऊस तोडणीसाठी घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांना सांगली येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर दि. १३ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्य झाला.

बाबासाहेब तोगे यांच्या मृत्यूनंतर दि. १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह एका ॲम्ब्युलन्समधून रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास केज पोलिस ठाण्यात घेऊन आले. बाबासाहेब तोगे याचा मृत्यू हा ऊसतोड मुकादम अशोक काशिनाथ केदार, नानाभाऊ काशिनाथ केदार आणि अशोक केदार यांनी केलेल्या मारहाणीत झाला असल्याने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

दरम्यान, सांगली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. शवविच्छेदन करून त्याचे मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी व्हीसेरा प्रयोगशाळेकडे पाठविला असून त्याचा स्पष्ट अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT