Beed News : अठरा विद्युत खांब काढून दुसरीकडे लावले; महावितरणला उशिरा जाग !

अभियंत्याच्या तक्रारीवरून कंपनीविरोधात गुन्हा; गेवराईमध्ये प्रशासनाचा सावळा गोंधळ
Beed News
Beed News : अठरा विद्युत खांब काढून दुसरीकडे लावले; महावितरणला उशिरा जाग !file photo
Published on: 
Updated on: 

Eighteen electricity poles removed and relocated; Mahavitaran wakes up late!

बीड, गेवराई, पुढारी वृत्तसेवा महावितरणचे अठरा विद्युत वाहक पोल आणि दोन रोहित्र स्थलांतरित केल्याचा प्रकार देवपिंप्री परिसरात घडला. या घटनेला तब्बल एक वर्ष झाल्यानंतर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे हे पोल उचलून दुसरीकडे लावले, पुन्हा सुरु केले असा सगळा खेळ झालेला असतांना महावितरणचे अधिकारी, कर्मचारी अनभिज्ञ होते, याबाबत आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व प्रकारामुळे महावितरणचा कारभार नेमका कसा चालतो, हेच समोर आले आहे.

Beed News
Beed News : श्री संत तुकोबाराय पावनधाम २१ हजार दिव्यांच्या प्रकाशात उजळले

बीड जिल्ह्यात महावितरणमध्ये वेगवेगळे घोटाळे, गलथानपणाचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपासून गेवराई तालुक्यात कामे न करताच बिले उचलल्याचा प्रकार चर्चेत असतांना आता तर अठरा पोल आणि दोन विद्युत रोहित्र स्थलांतरी केल्याची माहितीच महावितरणला नसल्याचे समोर आले आहे.

गेवराई तालूक्यात सेल रि पॉवर या कंपनीने त्यांच्या सोयीसाठी माटेगाव उपकेंद्रातून देवपिंपरी शिवारातून गेलेले अठरा खांब आणि दोन रोहित्र वर्षभरापूर्वी स्थलांतरीत केले. ही बाब संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले नाही की 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष करण्यात आले, हा संशोधनाचा विषय आहे. परंतु या संदर्भात तक्रार आल्यानंतर चौकशी केली असता, असा प्रकार घडल्याचे महावितरणला दिसून आले. यानंतर अर्ज-चौकश्या करुन अखेर या कंपनीसह अमोल राठोड नावाच्या व्यक्ती विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंतु विद्युत प्रवाह सुरु असलेले हे खांब कधी, कोणी, कोणाच्या परवानगीने उचलून दुसरीकडे लावले? असा प्रश्न निर्माण होत असून या सर्व प्रकाराला जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार की नाही, असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सर्वसामान्यांना मारावे लागतात खेटे !

महावितरणची साधी तार एखाद्याच्या भूखंडावरून गेली असेल, पोल मध्ये येत असेल तर तो हटवण्यासाठी महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ सर्वसामान्यांवर येते. तर दुसरीकडे धनदांडग्यांच्या कंपन्या महावितरणला अंधारात ठेवून तब्बल अठरा पोल आणि दोन रोहित्र स्थलांतरीत करतात, तरी माहिती होत नसल्याची बाब समोर आल्याने हा सगळा कारभार कसा चालतो, हेच या निमित्ताने समोर आले आहे. महावितरणच्या या कारभाराविरोधात आता संताप व्यक्त केला जात आहे.

तक्रार आली म्हणून समजले : राजपूत

गेवराई तालुक्यातील राजपिंप्री शिवारात महावितरणचे अठरा पोल आणि दोन रोहित्र परवानगी न घेता स्थलांतरित करण्यात आल्याची तक्रार कार्यालयाला प्राप्त झाली होती, त्यानंतर चौकशी करण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांनी दिली. या प्रकरणाबाबत मी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अधिक माहिती माझ्याकडे नाही, आता सर्व माहिती घेणार असल्याचे प्रेमसिंग राजपूत यांनी सांगितले.

Beed News
Illegal Sand Mining Beed | आष्टी पोलिसांचा वाळू तस्करांवर छापा; दोन टिप्पर पकडले, २७.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जबाबदारी निश्चित केली नाही : कुंभार

गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार देणारे अभियंता शाम कुंभार यांच्याशी संपर्क साधत महावितरणमधील ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर या विभागाची जबाबदारी आहे, त्यांना या सर्व प्रकाराबाबत माहिती नव्हती का? असे विचारले असता, ते मला सांगता येणार नाही. जेव्हा वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास ही बाब आली तेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची कार्यालयीन स्तरावर चौकशी करून जबाबदारी निश्चित होईल अशी माहिती कुंभार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.