assault case file photo
बीड

Kaij Crime News : पीडितेला तपासणीसाठी चक्क दहा तास ताटकळत ठेवले

केज उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार; दोषींवर होणार कारवाई

पुढारी वृत्तसेवा

केज : उन्हाळी सुट्टीत आजोळी मामाकडे आलेल्या एका आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत मामाच्या म्हणजे नात्याने चुलत मामेभाऊ आलेल्या २५ वर्षीय युवकाने घराचा दरवाजा लावून घेत तिचे तोंड आणि हात रुमालाने बांधून बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना केज तालुक्यातील एका गावात घडली होती.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या पालकांना प्रतीक्षा करावी लागली तर दुसरीकडे वैद्यकीय तपासणीसाठी दहा तास ताटकळत बसण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

२२ मे रोजी माजलगाव तालुक्यातील एका गावात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली तेरा वर्षांची मुलगी ही तिच्या आत्यासोबत केज तालुक्यातील दैठणा येथे तिच्या मामाच्या गावी आजोळी आली होती. दि २५ रोजी ती घरात एकटीच झोपली होती. त्या दरम्यान दुपारी ३:०० वाजता तिच्या चुलत मामाचा २५ वर्ष वयाचा मुलगा नात्याने तिचा चुलत मामेभाऊ घरी आला. घरी आल्या नंतर त्याने आजीची चौकशी केली. तेव्हा ती अल्पवयीन मुलगी त्याला म्हणाली की, तिची आजी सरपण आणण्यासाठी शेतात गेली आहे. तरीही तो घरात आला आणि घरात कोणी नसल्याने त्या मुलीने त्याला घरात येण्यास विरोध केला तरी तो घरात घुसला.

घरात येताच त्याने आतून दरवाजा बंद करून दाराची कडी लावून घेतली. दरवाजा बंद करताच ती मुलगी ओरडू दरवाजाची कडी उघडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पाठीवर चापट मारून तिचे दोन्ही हात दोरीने बांधले व तिच्यावर बलात्कार केला. त्याने तिचे तोंड रूमालाने बांधले. तिने त्या नंतर पीडित मुलीच्या तक्रारी वरून तिचा चुलत मामेभाऊ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर हे तपास करीत आहेत.

आरोपी घरातच लपून बसला होता अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर सरपण आणण्यासाठी शेतात गेलेली मुलीची आजी सरपण घेऊन परत घरी आल्याची चाहूल लागताच त्याने तिचे दोरीने बांधलेले हात सोडले आणि कुणाला काही सांगू नको अन्यथा जिवे मारण्याची धमकी देऊन अंगावर गोधडी घेऊन घरातच लपून बसला होता.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम यांनी रात्री त्याच्या गावात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.

रुग्णालय प्रशासनाची उदासीनता

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्या नंतर महिला पोलिस पीडित मुलीला घेऊन उपजिल्हा रुग्णालय केज येथे गेल्या नंतर तत्काळ तिची वैद्यकीय तपासणी करण्या ऐवजी स्त्रीरोग तज्ज्ञ महिला वैद्यकीय अधिकारी या ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन करीत असल्याचे सांगून त्या अल्पवयीन मुलीला तब्बल दहा तास ताटकळत ठेवल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्या नंतर दि. २८ मे रोजी जिल्हा शल्य चिकित्सक सोळंके यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली. मात्र चौकशीचा अहवाल हाती लागलेला नाही. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात. हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २९ मे पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT