Jalna Crime News | अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; आंघोळ करतानाचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी

जालना हादरला
Jalna Crime News |
Jalna Crime News | अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; आंघोळ करतानाचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकीPudhari File Photo
Published on
Updated on

जालना (पारध) : घरात एकटी असताना आंघोळ करत असलेल्या एका नववीतील अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फोटो काढून, त्या आधारे तिला तब्बल दहा वर्षे ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार पाशवी बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार जालन्यात उघडकीस आला आहे. एवढेच नाही, तर या वासनांध नराधमाने आणि त्याच्या कुटुंबाने या पीडित मुलीवर हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी अमानुष दबाव टाकला. तिला कुराण वाचायला लावून, नमाज पठणाची सक्ती करत चक्क बुरखा घालण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. या धर्मांतराच्या भयानक प्रकरणाने संपूर्ण जालना जिल्हा हादरून गेला असून, पारध पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी शेख इम्रानसह त्याच्या कुटुंबातील चार जणांवर पोक्सो आणि अन्य गंभीर कलमांन्वये मंगळवारी (दि.5 मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्मांतरासाठी अमानुष छळ

या प्रकरणात केवळ शेख इम्रानच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंब सामील होते. विवाहित इम्रानने पीडितेला उर्दू आणि मराठी भाषेतील कुराण देऊन तिला नमाज कसा पढायचा याची सक्ती केली. सौदी अरेबियामध्ये नोकरी लावण्याचे आमिषही दाखवले. व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल करून कपडे काढायला लावण्यापर्यंत या नराधमाची मजल गेली होती.

भाच्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

केज : मामा-मामीला भेटण्यासाठी आलेल्या 29 वर्षाच्या भाच्याने घरी कोणी नसताना सोमवारी रात्री मामाच्या दहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची निंदनीय घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली. केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 4 मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील इटकुर (ता. कळंब) येथील एक 29 वर्षीय तरुण हा त्याच्या आजोळी मामा-मामीकडे आला होता. केज न्यायालयात समोर हजर केले असता त्यास 9 मे पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news