Majalgaon Dam : माजलगाव धरणाची उंची वाढवण्यापेक्षा गाळ काढा; नितीन नाईकनवरे यांची आ. सोळंकेंवर टीका file photo
बीड

Majalgaon Dam : माजलगाव धरणाची उंची वाढवण्यापेक्षा गाळ काढा; नितीन नाईकनवरे यांची आ. सोळंकेंवर टीका

पुनर्वसित गावांच्या हिताचा विचार करण्याची मागणी; पत्रकार परिषदेत विविध प्रश्न उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

Instead of increasing the height of Majalgaon Dam, remove silt; Nitin Naiknavare criticizes MLA Solanke

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला पुनर्वसित २५ गावांचा तीव्र विरोध असताना आमदार प्रकाश सोळंके उंचीवाढीचा आग्रह नेमका कशासाठी धरत आहेत, असा थेट सवाल करत नितीन नाईकनवरे यांनी आमदार सोळंक्यांवर जोरदार टीका केली आहे. धरणाची उंची वाढविण्यापूर्वी पुनर्वसित गावांतील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्याबरोबरच धरणातील गाळ काढणे आणि पर्यायी बंधारे उभारणे या उपायांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेत मोठ्या स्क्रीनवर विविध व्हिडिओ सादर करत नाईकनवरे यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या धरणाच्या उंचीवाढीबाबतच्या विधानांचा संदर्भ दिला. धरणाची उंची वाढविल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्यास आपण 'बॉण्ड'वर लिहून देतो, असे विधान आमदार सोळंके यांनी एका पत्रकार परिषदेत केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, त्यानंतरच्या दिवशी 'मी जलसंपदा विभागाचा अधिकारी आहे का?' अशी भूमिका त्यांनी घेतल्याचेही नाईकनवरे यांनी निदर्शनास आणून दिले.

गाळ काढल्यास आणि पर्यायी बंधाऱ्यांतून मोठा पाणीसाठा शक्य

माजलगाव धरणाची उंची वाढविल्यानंतर केवळ १ ते १.२५ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्याऐवजी धरणातील गाळ काढल्यास सुमारे चार टीएमसी आणि गुंजथडी, मंजरथ, हिवरा, डेपेगाव, राजेवाडी, दिंदुड, उमरी व कोथूळ परिसरात सादोळा बंधाऱ्याच्या धर्तीवर बंधारे उभारल्यास सुमारे ५.५ टीएमसी पाणीसाठा निर्माण होऊ शकतो, असा दावा नाईकनवरे यांनी केला. यामुळे उंचीवाढीपेक्षा गाळ काढणे व पर्यायी बंधाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT