Beed Crime News : आष्टी तालुक्यात व्यापाऱ्याला टोळक्याकडून बेदम मारहाण

डोक्यात दगड घातल्याने महाडीक गंभीर जखमी
Beed Crime News
Beed Crime News : आष्टी तालुक्यात व्यापाऱ्याला टोळक्याकडून बेदम मारहाणfile photo
Published on: 
Updated on: 

Beed Crime News : A trader was brutally beaten up by a gang in Ashti taluka

कडा, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील शेरी फाटा येथे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या तरुणाला 'आमच्या दाजीला शिवीगाळ का केली?' असे म्हणत 7 ते 8 अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची घटना 1 ऑक्टोबर रोजी रात्री घडली. मारहाणीदरम्यान एका व्यक्तीने दगडाने डोक्यात वार केल्याने प्रसिद्ध लिंबू व्यापारी अक्षय महाडीक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कडा येथील हारकर हॉस्पिटलच्या मध्ये उपचार सुरू आहेत.

Beed Crime News
Beed News : दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने जीवन संपवले

फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, शेरी फाटा येथील अंबिका लॉजसमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास अक्षय महाडीक जेवण्यासाठी आले होते. जेवण करून पैसे दिल्यानंतर ते हॉटेलमधून बाहेर पडत असताना तेथे उपस्थित असलेल्या 7 ते 8 अज्ञात व्यक्तींपैकी एकाने त्यांना आवाज देऊन परत बोलावले.

'आमच्या दाजीला शिवीगाळ का करतो?' असे म्हणत संबंधित व्यक्तीने अक्षय यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी अक्षय यांना हॉटेल समोर नेऊन त्यांच्या डोक्यात, पाठीत व तोंडावर मारहाण केली.

Beed Crime News
Beed Crime : ‘आमच्या दाजीला शिवीगाळ का केली?’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण करून टोळक्यांचा हल्ला

सात ते आठ अज्ञातांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात 7 ते 8 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार भाऊसाहेब आसाराम आहेर करीत असून, परीक्षाधीन उपअधिक्षक भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू असून पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news