संतोष देशमुख हत्‍या प्रकरण. (File Photo)
बीड

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला वेगाने चालविण्याचे संकेत !

विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर १७ जूनला निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Indications that the trial in the Santosh Deshmukh murder case will be fast-tracked!

बीड, पुढारी वृत्तसेवा : राज्यभर चर्चेत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सोमवारी नवे वळण मिळाले. नवनियुक्त न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंकडून सविस्तर युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार असून त्यादिवशी विष्णू चाटेच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सुनावणीच्यावेळी विशेष सरकारी पक्षाने खटल्याच्या गतीबाबत व्यक्त केलेली चिंता न्यायालयाने गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले. येत्या सुनावणीत कोणत्या साक्षीदारांची साक्ष कधी नोंदविण्यात येणार याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार असून त्यानंतर खटल्याच्या नियमित सुनावणीला वेग मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आरोपी विष्णू चाटे याने तपासातील लॅपटॉपची क्लोन कॉपी देण्याची मागणीही केली होती. याबाबत फॉरेन्सिक तपासातून जे दस्तऐवज उपलब्ध झाले ते सर्व आरोपींना देण्यात आल्याचे सरकारी पक्षाने स्पष्ट केले.

विष्णू चाटे च्या अर्जासोबतच जयराम चाटेच्या जामीन अर्जावरही 17 जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

अटक प्रक्रियेचा मुद्दा दीड वर्षानंतर उपस्थित करण्यात येत आहे. जुने मुद्दे पुढे करून खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीही मी न्यायालयात म्हटले होते की आरोपींतर्फे 'डी-फॉर-डिले' ऑपरेशन चालविले जात आहे. न्यायालयाने खटला वेगाने चालविण्याबाबत आमची भूमिका मान्य केली असून आता सुनावणीला गती मिळेल.
- अॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT