Beed News : तुम्ही चंदशेखर बावनकुळेंना अपमानास्पद बोलाल, तर आम्ही एकनाथ शिंदेंना बोलणार file photo
बीड

Beed News : तुम्ही चंदशेखर बावनकुळेंना अपमानास्पद बोलाल, तर आम्ही एकनाथ शिंदेंना बोलणार

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा

पुढारी वृत्तसेवा

If you insult Chandshekhar Bawankule, we will insult Eknath Shinde

बीड, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील हे ओबीसी महसूलमंत्री नको म्हणून जाणीवपूर्वक बावनकुळे यांना टार्गेट करत आहेत. ते त्यांच्याविषयी अपशब्द वापरत आहेत, त्यांनी यापुढे त्यांचा एकेरी उल्लेख केला तर आम्ही देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करणार असल्याचा इशारा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.

अॅड. गुणरत्न सदावर्ते शुक्रवारी बीड येथे विलास घुले हत्या प्रकरणातील मोर्चासाठी आले होते. या मोर्चानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलतांना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा भूमिकेवर जोरदार टीका केली.

मनोज जरांगे हे जाणीवपूर्वक बावनकुळे, शिरसाठ यांच्यावर टीका करत आहेत, ते बोलतांना एकेरी उल्लेख करतात. आम्ही यापुढे असे प्रकार सहन करणार नाही. जरांगे ज्या भाषेत बावनकुळे व इतर ओबीसी नेत्यांना बोलतील, त्याच भाषेत आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलणार असल्याचे सदावर्ते यावेळी म्हणाले.

त्यांना जर हीच भाषा समजणार असेल तर आम्ही तसे बोलू, हा अँटी डोस असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. मनोज जरांगे हे शिरसाठ यांना टार्गेट करत आहेत, ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडून टेंडर मिळण्यासाठी जरांगे त्यांच्यावर देखील आरोप करत आहेत असे सदावर्ते यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT