Beed Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण, अत्याचारप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. घोरपडे यांचा महत्त्वपूर्ण निकाल
Court News
Court Newsfile photo
Published on
Updated on

Accused sentenced to hard labour in kidnapping and torture of minor girl

बीड, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर येडे याला बीड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. घोरपडे यांनी दोषी ठरवत २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. मंजूषा दराडे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले ठोस पुरावे या निकालात महत्त्वाचे ठरले.

Court News
Beed Theft News : घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

बीड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला आरोपी ज्ञानेश्वर येडे याने बोलेरो वाहनातून फूस लावून लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेले. त्यानंतर शेतात तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप होता. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या वडिलांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर प्रकरणात अत्याचार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमे वाढविण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील यांनी केला. त्यानंतर महिला विशेष पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक सीमाली कोळी यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम ३६३, ३६६ (अ), ३७६ (२) (एन) तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ४(२) व ६ अन्वये दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले.

Court News
Parali News | परळीतील 23 वर्षीय जीम ट्रेनर तरुणीची उचलले टोकाचे पाऊल!

सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. न्यायालयीन पुराव्यांतून पीडिता अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाले. आरोपीविरुद्ध उपलब्ध ठोस पुरावे आणि सरकार पक्षाचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ज्ञानेश्वर येडे याला दोषी ठरवत २० वर्षांची सक्तमजुरी सुनावली. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील अॅड. मंजूषा दराडे यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यांना सहाय्यक सरकारी वकील अॅड. अमित हसेगावकर यांनी सहकार्य केले. न्यायालयीन कामकाजासाठी महिला पोलीस शिपाई सिंगल, आर. बी. सानप आणि ए. बी. बर्डे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news