Beed News : मॉडिफाइड सायलेन्सर लावलेल्या १० बुलेटधारकांना दंड

बीडमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर वाहतूक शाखेची कारवाई
Beed News
Beed News : मॉडिफाइड सायलेन्सर लावलेल्या १० बुलेटधारकांना दंड file photo
Published on
Updated on

Beed News: 10 Bullet motorcycle owners fined for installing modified silencers

बीड, पुढारी वृत्तसेवा : मॉडिफाइड सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करत धावणाऱ्या बुलेट मोटारसायकर्लीविरोधात बीड जिल्हा वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम राबवली. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत शहरातील माने कॉम्प्लेक्स, अण्णा भाऊ साठे चौक, डी.पी. रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये १० बुलेटधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Beed News
Beed Theft News : घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील व पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मॉडिफाइड सायलेन्सरमुळे होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने वाहनांमध्ये बदल करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.

या कारवाईत पोलीस हवालदार सखाराम घोलप, कुडके, राजाभाऊ तांदळे, जमादार शेषनारायण गाडे, पोलीस अंमलदार मोरे, अनिकेत घुले, शुभम सानप, कानडे, चेतन दहातोंडे, पोलीस हवालदार काकडे तसेच चालक हारके व कदम यांनी सहभाग घेतला.

Beed News
Beed Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण, अत्याचारप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

वाहतूक नियम मोडणाऱ्यांची गय नाही : वैभव पाटील

वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी सांगितले की, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हे वाहतूक शाखेचे उद्दिष्ट आहे. नियमबाह्य बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे, असे त्यांनी आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news