Beed crime pudhari photo
बीड

Beed crime : गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी अटकेत

फरार आरोपींचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : गेवराई शहरातील संजयनगर परिसरात शेख मुसा यांच्यावर कत्तीने हल्ला करून त्यानंतर बंदुकीतून गोळीबार केल्याच्या प्रकरणात गेवराई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेत शेख मुसा यांच्या उजव्या मांडीला गोळी लागून ते जखमी झाले होते. गोळीबाराच्या घटनेने संजय नगर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता संजयनगर परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी रिजवाना मुसा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, शेख मुसा हे शकुंतला शिंदे हिच्यासोबत राहत असून, ते चार दिवसांपासून घरी न आल्याचा राग मनात धरून आरोपी चारचाकी वाहनातून संजयनगर येथे आले.

यावेळी शेख मुसा यांच्यावर कत्तीने हल्ला करण्यात आला. त्यानंतर मंगेश शिंदे याने बंदुकीतून गोळीबार केला. यात शेख मुसा यांच्या उजव्या मांडीला गोळी लागली. याचवेळी त्यांचा मुलगा इरफान याच्या मागे बंदूक घेऊन धावणे तसेच नागरिकांना धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास करताना गेवराई पोलिसांनी शकुंतला भुराजी शिंदे (४५), दीपक शिंदे (२८) आणि हिना, रा. स्टेडियम परिसर, गेवराई या तीन आरोपींना अटक केली आहे.दरम्यान, गुन्ह्यातील अन्य फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, घटनेत वापरण्यात आलेल्या वाहनाचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान दौड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT