Gambling den under the name of sports board; Rural police raid
बीड, पुढारी वृत्तसेवा : शहरापासून जवळच असलेल्या तळेगाव शिवारात अभिनव क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली एका इमारतीत जुगार अड्डा चालवला जात होता. या ठिकाणी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री धाड टाकत २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बीड शहराजवळच्या तळेगाव शिवारात अभिनव क्रीडा व सांस्कृतिक मंडळ असा बोर्ड लावलेल्या इमारतीत जुगार अड्डा चालवला जात असल्याची माहिती सपोनि बाळराजे दराडे यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांना माहिती कळवत दोन पंचांना सोबत घेत तळेगाव शिवारातील इमारतीत धाड टाकली असता त्या ठिकाणी आठजण जुगार खेळत असतांना आढळून आले.
यामध्ये दिपक गायकवाड, हनुमान सुरवसे, लक्ष्मण नवले, शाम विर, भाऊसाहेब शेळके, सुभाष शिंदे, भारत जाधव, राधाकिसन लोंढे यांचा समावेश होता. त्यांच्याकडील रोख रक्कम, मोवाईल, दोन कार, तसेच दुचाकी असा एकूण २३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या ठिकाणी दारुच्या देखील आढळून आल्या.
या अभिनव क्रिडा मंडळाचा अध्यक्ष सचिन जाधव असून या प्रकरणात मंडळाचा सचिव छत्रभुज वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्यासह अतिश मोर-बॉटल्साळे, फे रोज पठाण, नामदेव सानप, कांदे यांनी केली.