Pankaja Munde wins Legislative Council elections
पंकजा मुंंडे विधान परिषद निवडूकीत विजयी Pudhari File Photo
बीड

बीड : अखेर भाजपाकडून पंकजा मुंडेंचे पुनर्वसन

पुढारी वृत्तसेवा

बालाजी तोंडे

बीड, पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषद निवडणुकीमध्ये विजयी झाल्या. त्या 26 मते घेत विजयी झाल्या असून त्यांच्या विजयानंतर बीड येथे फटाक्याची आतषबाजी करत अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली. लोकसभा निवडणूकीमध्ये अत्यल्प मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर न खचता त्याने हे यश मिळवण्यात यशस्वी झाल्या आहेत.

दरम्यान ग्रामविकास मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी ग्रामीण भागात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दर्जेदार रस्त्यांचे जाळे तयार केले. लोकलची बचत गटाची चळवळ ग्लोबल केली. त्यांच्याकडील खात्यातील कामांचा रोल मॉडेल म्हणून अनेकदा केंद्र सरकारच्या वतीने गौरव करण्यात आला.

शिक्षणक बदल्यातील घोडेबाजार थांबवून 1 रूपयाचा अर्ज भरून ऑनलाईन बदलीचा उपक्रम सुरू केला. ग्रामविकास मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी पाच वर्षे सर्वोत्तम काम केले. या परिस्थितीत 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर राज्यातील भाजपच्या नेतृत्वाने पंकजा मुंडे यांची अफाट लोकप्रियता असतानाही त्यांना एकप्रकारे वाळीत टाकून दुर्लक्षित केले. अनेकदा राज्यसभा, विधान परिषदेवर त्यांना घेतले जाणार असल्याची चर्चा घडवून आणली. परंतू पाच वर्षे कोणतेही पद न देता पंकजा मुंडे यांचे पुनवर्सन करण्याचे जाणीवपुर्वक टाळले.

संघर्ष यात्रा काढून 2014 मध्ये भाजपाची सत्ता आण्यात योगदान

2014 मध्ये पंकजा मुंडे यांनी सिंदखेडराजा ते चौंडी अशी संघर्षयात्रा काढून राज्यात भाजपाची सत्ता आणण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. तसेच गोपीनाथ यांच्यानंतर माळी, धनगर, वंजारी अशी माधवची मोट बांधण्याचे काम देखील पंकजा मुंडे यांनीच केले होते. पंकजा यांनाच पक्षाने दुर्लक्षित केल्याने मागील काही वर्षात माधवची मोट सैल झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. या परिस्थिीतीत माधवही भाजपापासून दुर गेला तर पक्षाचे मोठे नुकसान होईल, यामुळेच भाजपाने पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन केले. भाजपाला त्यांचा डीएनए ओबीसी असल्याचे दाखवून द्यायचे असेल तर पंकजा मुंडे यांना राज्यात तोलामोलाचे मंत्रीपद देणे गरजेचे आहे. विस्तारात ते दिले जाईल, असा विश्‍वास मुंडे समर्थक व्यक्त करत आहेत.

पाच युवकांनी संपवली जीवनयात्रा

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. मुंडे समर्थकांच्या हा पराभव एवढा जिव्हारी लागला की पाच युवकांनी निराश होऊन जीवन संपवले. तसेच सर्व स्तरातून पंकजा मुंडे यांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी भाजपावर लोकांचा प्रचंड दबाव होता.

SCROLL FOR NEXT