Maharashtra MLC Election : पंकजा मुंडेसह महायुतीचे 9 उमेदवार विजयी!

शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव
Pankaja Munde Maharashtra Legislative Council Election
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा विजय झाला.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pankaja Munde MLCouncil Election : लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात विधान विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. शुक्रवारी 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरल्याने गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित ठरलेल्या निवडणुकीसाठी सकाळी मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. यात महायुतीमधील घटक पक्ष भाजपचे सर्व पाच उमेदवार निवडून आले आहेत. भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत हे विजयी झाले. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनीही विजय मिळवला.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघांनीही पहिल्या पसंतच्या मतमोजणीत 23 मतांचा कोटा पूर्ण केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदारांचे संख्याबळ होते. महायुतीच्या मतांची फाटाफूट झाली नाही आणि महायुतीची मते मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवला. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे आता विधानपरिषदेत आमदार म्हणून बसतील.

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव 26 मते मिळवून विजय झाल्या. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली. मात्र त्यांना विजय मिळवण्यासाठी एक मताची वाट पाहावी लागत आहे.

महायुतीचे उमेदवार

  • भाजपा : पंकजा मुंडे – 26 मते (विजयी)

  • भाजपा : परिणय फुके – 26 मते (विजयी)

  • भाजपा : योगेश टिळेकर – 26 मते (विजयी)

  • भाजपा : अमित गोरखे – 26 मते (विजयी)

  • भाजप : सदाभाऊ खेत – .24 मते (विजयी)

  • शिवसेना एकनाथ शिंदे गट : भावना गवळी – 24 (विजयी)

  • शिवसेना एकनाथ शिंदे गट : कृपाल तुमाने – 25 (विजयी)

  • राष्ट्रवादी अजित पवार गट : राजेश विटेकर – 23 मते (विजयी)

  • राष्ट्रवादी अजित पवार गट : शिवाजीरावर गर्जे – 24 (विजयी)

महाविकास आघाडीचे उमेदवार

  • काँग्रेस : प्रज्ञा सातव – 25 मते (विजयी)

  • शिवसेना उद्धव ठाकरे गट : मिलिंद नार्वेकर – 22 मते

  • जयंत पाटील (शेकाप) – 8 मते

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news