पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी; कार्यकर्त्याने ५ हजार नारळ फोडून केली नवसपूर्ती

बीडच्या गणेश लांडे या समर्थकाने पूरक गणेशाला केलेला नवस
Pankaja Munde's chance at Legislative Council; Activists broke 5000 coconuts and fulfilled their vows
बीडच्या गणेश लांडे या समर्थकाने पूरक गणेशाला केलेला नवस केला पूर्ण Pudhari Photo

बीड : पुढारी वृत्तसेवा

पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात निसटता पराभव झाला होता. यानंतर राज्यसभा अथवा विधान परिषदेवर संधी मिळावी अशी मागणी केली जात होती. भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देताच त्यांच्या बीड येथील गणेश लांडे या समर्थकाने नामलगाव येथील अशा पूरक गणेशाला केलेला नवस पूर्ण केला असून यासाठी त्यांनी 5000 नारळ या ठिकाणी मंदिरात फोडले आहेत.

Pankaja Munde's chance at Legislative Council; Activists broke 5000 coconuts and fulfilled their vows
Parliament Monsoon Session|सत्य हे सत्यच असते! राहुल गांधी

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग बीडसह मराठवाड्यात आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव या समर्थकांना जिव्हारी लागला होता. यातूनच अगदी चार जणांनी आत्महत्या केल्याचे देखील समोर आले होते. यानंतर आता लोकसभा निवडणुकीला 25 दिवस होत नाहीत तोच भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Pankaja Munde's chance at Legislative Council; Activists broke 5000 coconuts and fulfilled their vows
Parliament Monsoon Session Live|PM मोदी भाषणाला उभे राहताच विरोधकांचा गदारोळ

उमेदवारी जाहीर होताच बीडमध्ये फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण पाहायला मिळाली, तर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर संधी मिळावी यासाठी बीड मधील गणेश लांडे या समर्थकाने आशापूरक गणेशाला 5000 नारळ फोडण्याचा नवस बोलला होता. ही संधी मिळताच त्याने आज या नवसाची पूर्तता केली. या ठिकाणी 5000 नारळ फोडण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित होते. पंकजा मुंडे यांच्या या समर्थकाची आणि त्याने पूर्ण केलेल्या नवसाची आता सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news