Beed News : आष्टी मतदार संघातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  File Photo
बीड

Beed News : आष्टी मतदार संघातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

आष्टी मतदार संघातील भूसंपादन, सिंचन योजना, रस्ते, वनीकरण आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.

पुढारी वृत्तसेवा

District Collector directs to expedite various development projects in Ashti constituency

आष्टी, पुढारी वृत्तसेवा: आष्टी मतदार संघातील भूसंपादन, सिंचन योजना, रस्ते, वनीकरण आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीला आमदार सुरेश धस, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष साळवे, अधीक्षक अभियंता श्री. शिंगाडे, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, वशिमा शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल गरकल तसेच संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, आष्टी, पाटोदा व शिरुर कासार मतदार संघातील सुरू असलेली विकासकामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. ज्या कामांत अडचणी आहेत त्या जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवून गती देण्यात याव्यात. यामुळे पाणी व्यवस्थापन सुधारेल, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध होतील आणि नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल. पैठण-पंढरपूर रा.मा. २७२ ई प्रकल्पातील शेतकऱ्यांना मावेजा वाटप. शेतकऱ्यांच्या विमा तक्रारी, देवस्थान विकासावर निर्बंध आदी विषयांवरही चर्चा झाली. या बैठकीस आष्टी मतदार संघातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. अधिकाऱ्यांनी समस्या ऐकून घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीत प्रमुख निर्णय

कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र. ०३ अंतर्गत खुंटेफळ साठवण तलावासाठी भूसंपादन तातडीने पूर्ण करणे. सिंदफणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी अतिरिक्त भूसंपादन प्रक्रिया गतीमान करणे. मदमापुरी, उखळवाडी, तलावाच्या प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेवर निर्णय. महसूल, जिल्हा परिषद, वन विभागाच्या जमिनी नगरपंचायतींना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया. अभयारण्यात गॅरीसिडिया वृक्षांचे उच्चाटन करून औषधी व देशी वनस्पतींची लागवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT