धारूर पोलिसांची कारवाई; अवैध देशी दारूसह मोटारसायकल जप्त  pudhari photo
बीड

Dharur illegal liquor raid : धारूर पोलिसांची कारवाई; अवैध देशी दारूसह मोटारसायकल जप्त

कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ

पुढारी वृत्तसेवा

धारूर : अवैध देशी दारू विक्री व वाहतुकीवर धारूर पोलिसांनी मोठी कारवाई करत परिसरातील बेकायदेशीर धंद्यांवर जोरदार आघात केला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 एप्रिल रोजी सायंकाळी कासारी फाटा परिसरात सापळा रचून छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपीच्या ताब्यातून देशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

या कारवाईत सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपी बेकायदेशीररित्या दारू विक्री करून आर्थिक फायदा मिळवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे, हेड कॉन्स्टेबल शिवाजी सानप, जमीर शेख व इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते. धारूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायावर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत असून, नागरिकांनीही पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT